Dron
Dronsakal

Raigad : शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अनुदान

कृषी विभागाचे अर्ज करण्याचे आवाहन; चार ते दहा लाखापर्यंत मदत

तळा : शासनामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी विविध उपकरणे अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून दिली जात आहेत. नुकतेच पिकांवर औषध फवारणीसाठी ड्रोन अनुदान योजना शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. शेतीसाठी ड्रोनचा वापर करायचा असेल तर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे तळा कृषी विभागाकडून शेतकरी, कृषी पदवीधर व शेतकरी उत्पादक कंपनी यांना ड्रोन खरेदीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शासनाकडून आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्‍साहन देण्यात येत आहे. त्‍यातच शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातले आहे. त्यामुळे शेतीची कामे अगदी सहजपणे आणि सोप्या पद्धतीने होण्यास मदत होत आहे. त्‍याअनुषंगाने ड्रोनचा वापर शेतीसाठी करण्यासाठी शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत; मात्र ड्रोन खरेदीवर अनुदान मिळवायचे असेल तर अगोदर त्यासंबंधीची पूर्वसंमती घ्यावी लागणार आहे.

ड्रोनचा फायदा काय?

1 ड्रोनचा वापर पिकांची पाहणी करण्यासाठी तसेच पिकांवरील रोगांची तपासणी करण्यासाठी करता येतो.

2 पिकांवर फवारणी करण्यासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त क्षेत्रावर ड्रोनच्या मदतीने फवारणी करता येते.

3 ड्रोनला लावलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने पिकांवरील कीड, रोगांची माहिती ठेवता येते.

किती अनुदान मिळणार?

विद्यापीठे व सरकारी संस्था- १०० टक्के अनुदान (१० लाखांपर्यंत)

शेतकरी उत्पादक संस्था- ७५ टक्के अनुदान (७ लाख ५०,००० रुपये)

कृषी पदवीधारकासाठी- ५ लाखांपर्यंत अनुदान

इतर शेतकऱ्यांना ४० टक्के किंवा ४ लाख अनुदान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com