Food Delivery
Food DeliverySakal

पदार्थ एकच, पण ऑनलाइन-ऑफलाइन किंमतीत मोठा फरक; वाचून बसेल धक्का

ऑर्डर केलेल्या एकाच खाद्यपदार्थाच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन बिलांची तुलना केली तेव्हा त्यांना या दोन्ही किंमतीत मोठी तफावत आढळली.
Summary

ऑर्डर केलेल्या एकाच खाद्यपदार्थाच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन बिलांची तुलना केली तेव्हा त्यांना या दोन्ही किंमतीत मोठी तफावत आढळली.

मुंबईत राहणाऱ्या राहुल काबरा यांनी ऑर्डर केलेल्या एकाच खाद्यपदार्थाच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन बिलांची तुलना केली तेव्हा त्यांना या दोन्ही किंमतीत मोठी तफावत आढळली. मग त्यांनी लिंक्ड-इनवर जाऊन या ऑर्डरची बिले शेअर केली आणि नेटिझन्सना धक्काच दिला.

त्यांनी निदर्शनास आणून दिले की, जेव्हा त्यांनी थेट रेस्टॉरंटमधून ऑर्डर केली आणि नंतर त्याच रेस्टॉरंटमधून ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवेद्वारे त्याच जेवणाची ऑर्डर दिली तेव्हा त्यांना अंतिम बिलिंग रकमेत मोठा फरक आढळला. यातून दिसून येते की, ऑनलाइन अन्न वितरण सेवा या प्रत्यक्षात रेस्टॉरंटमधून अन्न पदार्थ ऑर्डर करण्यापेक्षा अधिक नफा मिळवतात.

राहुल यांना दोन्ही खाद्यपदार्थांच्या बिलांमध्ये लक्षात आले की, ऑफलाइन ऑर्डर 512 रुपयांत आली, तर एका कंपनीद्वारे केलेली ऑनलाइन ऑर्डर 690 रुपयांना आली. (तीही 75 रुपये डिस्काऊंट देऊन.) या दोन्ही बिलांची तुलना केल्यानंतर राहुल म्हणाले, "ऑनलाइन डिलिव्हरी सेवेच्या माध्यमातून पुरवठादारांना अधिक ऑर्डर मिळतात, असे गृहीत धरले तरी, यासाठी इतकी जास्त किंमत आकारावी का? मला वाटते की, या वाढीव खर्चावर मर्यादा घालण्याची गरज आहे. ऑर्डरशी संबंधित हे गणित सर्व समभागधारकांसाठी सारख्याच फायद्याचं राहिल, असं धोरण सरकारनं राबवायला हवं.'

राहुल यांना उत्तर देताना ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी म्हणाली, "हाय राहुल, आम्ही ग्राहक आणि रेस्टॉरंट यांच्यामधील मध्यस्थ प्लॅटफॉर्म असल्याने आमच्या प्लॅटफॉर्मवर रेस्टॉरंटच्या पार्टनरने लागू केलेल्या किमतींवर कोणतेही नियंत्रण नाही. आम्ही तुमचा फीडबॅक रेस्टॉरंट पार्टनरला कळवला आहे आणि त्यांना याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.'

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे बिल समोर आल्यानंतर, ऑनलाइन अन्न वितरण कंपन्या ग्राहकांच्या सोयीनुसार सेवा देत असल्याने अतिरिक्त शुल्क आकारत आहेत की त्यांच्या सॉफ्टवेअरद्वारे किमती नियंत्रित करण्याचा फायदा घेत आहेत, हे सिद्ध करण्यासाठी नेटिझन्समध्ये चर्चेला उधाण आले. राहुल यांच्या पोस्टला एका वापरकर्त्याने उत्तर दिले की, "होय, ही त्यांची छुपी व्यावसायिक रणनीती आहे. शिवाय, एखाद्या अॅपवर रेस्टॉरंटला माहिती नसतानाही डिशच्या किमती सहज बदलू शकतात."

ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीला पाठिंबा देणार्‍या दुसर्‍या वापरकर्त्याने म्हटलं, 'बिल्सची तुलना केल्याबद्दल धन्यवाद. पण, त्यात ती ऑर्डर रेस्टॉरंटमधून तुमच्या घरी आणून देण्यापर्यंतच्या प्रवासाचा इंधन खर्च जोडा. तसेच, प्रवासासाठी तुम्हाला लागलेला वेळही जोडा. घरी जेवण मिळालं तो सोयीस्करपणाही त्यात जोडा. आणि जर तुमच्याकडे एखादी टीप असेल, तर ती देखील जोडा. तेव्हा मग तुमच्याकडून जितके पैसे घेतले त्याच्या आसपास ती रक्कम जाईल.'

दुसर्‍या वापरकर्त्याने या फूड डिलिव्हरी कंपन्यांवर आरोप केले की, या कंपन्या ऑनलाइन ऑर्डर केल्यास ऑफलाईन ऑर्डरपेक्षा कमी प्रमाणात अन्न देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com