आपआपल्या नवऱ्यांसाठी 'त्या' दोघींनी किडन्यांची केली अदलाबदल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

गोव्यातील रहिवासी रोमन यांना मुत्रपिंडा आजार झाल्याने त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या. या आजारात मुत्रपिंडात अनेक गळू तयार होतात. त्यामुळे त्याचे एक मुत्रपिंड 7 किलो आणि दुसरे मुत्रपिंड 5 किलो 800 ग्रॅमचे होते. त्यांच्यावर परळ येथील ग्लोबल येथे यशस्वी शस्त्रक्रिया करुन मृतपिंडाचे रोपण करण्यात आले आहे. देशात पहिल्यांदाच एकढ्या मोठ्या आकाराचे मुत्रपिंड काढण्यात आले आहे.

मुंबई : गोव्यातील रहिवासी रोमन यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती. त्यांच्या मूत्रपिंडात अनेक गळू तयार झाली होती. त्यामुळे त्यांचे एक मूत्रपिंड सात किलो आणि दुसरे मूत्रपिंड पाच किलो 800 ग्रॅमचे होते. त्यांच्यावर परळ येथील ग्लोबल रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करून मूत्रपिंडाचे रोपण करण्यात आले. देशात पहिल्यांदाच एकढ्या मोठ्या आकाराचे मूत्रपिंड काढण्यात आले आहे. 

घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत घातला दरोडा

रोमन यांना "ऑटोसोमल पॅलिसिस्टिक किडनी डिसीज' हा दुर्मिळ अनुवांशिक आजार होता. यात, मूत्रपिंडात अनेक गळू झाल्याने उतींची कार्यक्षमता कमी होते. तसेच, गळुमूळे मूत्रपिंडाचाही आकारही वाढतो. साधारण व्यक्तीच्या मूत्रपिंडाचे वजन 150 ग्रॅम पर्यंत असते. तर लांबी 8 ते 10 सेंटीमीटर असते. मात्र, रोमन यांच्या मूत्रपिंडाची लांबी 26 आणि 21 सेंटीमिटर होती. यामुळे वारंवार रक्तशुद्धीकरण करावे लागत होते. तसेच त्यांना दैनंदिन कामही करता येत नव्हती. त्यातच रोमन आणि त्यांच्या पत्नीचा रक्तगट एकमेकांशी जुळत नसल्याने त्यांना पत्नीचेही मूत्रपिंड घेता येणार नव्हते. अमरावती येथील नितिन या रुग्णांलाही मुत्रपिंडाची गरज होती. नितिन यांचे आणि त्यांच्या पत्नीचेही मूत्रपिंडही एकमेकांशी जुळत नव्हते. त्यावर ग्लोबल रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी दोन्ही कुटूंबांशी चर्चा करुन "मूत्रपिंड स्वॅप' पध्दतीने रोपण करायचे ठरले. यात, रोमन यांच्या पत्नीचे मूत्रपिंड नितीन यांना देण्यात आले. तर, नितीन यांच्या पत्नीचे मूत्रपिंड रोमन यांना देण्यात आले. 

ही बातमी वाचली का। "रेल्वे क्राॅसिंग'च्या कसरतीला ब्रेक!

रुग्णालयातील युरोलॉजी व रेनल ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ.प्रदिव राव आणि ग्लोबल रुग्णालय इन्स्टिट्यूट ऑफ रेनल सायन्ससचे संचालक डॉ.भारत शहा यांच्या नेतृत्वाखालील टीमने यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया केली आहे. डिसेंबर महिन्यात ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून दोन्ही रुग्णांची प्रकृती आता सुधारली आहे. दोघेही आपल्या दैनंदिन क्रिया सहज करु शकतील. असे डॉ.शहा यांनी सांगितले.

आमच्या टिममार्फत नेहमीच अशा किचकट उपचारांसाठी विशिष्ट गरजा पुरविण्यासाठी प्रयत्न करत असतो 
डॉ.विवेक तळवलीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्लोबल रुग्णालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful surgery on two kidneys of 12 kg