उल्हासनगर पालिका आयुक्तपदी सुधाकर देशमुख

Sudhakar Deshmukh as Ulhasnagar Municipality Commissioner
Sudhakar Deshmukh as Ulhasnagar Municipality Commissioner

उल्हासनगर : शिस्तबद्ध प्रशासनासोबत उल्हासनगरच्या विकासासाठी आर्थिक नियोजन महत्वाचे आहे. तशी रणनीती आखण्यात येणार, अशी प्रतिक्रिया पालिकेचे नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली.

काल राज्यपाल यांच्या आदेशानुसार धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर असणारे सुधाकर देशमुख यांची उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना धुळे येथील पदभारातून कार्यमुक्त होऊन त्वरित उल्हासनगरच्या आयुक्तपदी हजर होण्याच्या सूचना नगरविकास विभागाचे सहसचिव गोखले यांनी दिले होते. त्याची पूर्तता करताना सुधाकर देशमुख यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांचा पदभार हाती घेतला. पालिकेच्या प्रवेशद्वारावर जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी देशमुख यांचे स्वागत केले.

प्रथम शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून शहराच्या विकासा करिता आर्थिक नियोजना वर अधिक भर देण्यासोबत शहरासाठी चांगल्या बाबी आणि शिस्तबद्ध प्रशासन देण्याचा प्रयत्न असणार, असे सुधाकर देशमुख यांनी सांगितले.

'पहिला दिवस स्वागत-सत्काराचा' :
दरम्यान पहिल्या दिवशी महापौर पंचम कलानी, भाजपा जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, प्रदेश पदाधिकारी प्रकाश माखिजा, सभागृह नेते शेरी लुंड, नगरसेवक महेश सुखरामानी, डॉ. प्रकाश नाथानी, मनोज लासी, प्रदिप रामचंदानी, हरेश जग्यासी, उद्योगपती नंद जेठानी, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे यूनिट अध्यक्ष दिलीप थोरात, सामाजिक संघटनांनी सुधाकर देशमुख यांची भेट घेतली. त्यामुळे देशमुख यांचा पहिला दिवस स्वागत-सत्काराचा ठरला. सायंकाळी देशमुख यांनी पालिकेतील सर्व हेड ऑफ डिपार्टमेंटची बैठक घेऊन विविध कामांची माहिती घेतली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com