मोठी बातमी - मुनगंटीवार म्हणतात "आम्ही फसवलं, पण याचा फायदा कुणी उचलू नका"

मोठी बातमी - मुनगंटीवार म्हणतात "आम्ही फसवलं, पण याचा फायदा कुणी उचलू नका"

मुंबई - कोरोनामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे कामकाज शनिवारपर्यंत आटोपण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. अशात आज विधानसभेत चर्चा सुरु असताना भाजपचे मोठे नेते महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार एक अत्यन्त मोठा खुलासा केलाय. यामध्ये शिवसेना आणि भाजपबद्दल त्यांनी मोठं वक्तव्य केलंय. भाजपने शिवसेनेला फसवलं अशी कबुलीच सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिलीये. आमच्या चुकीचा फायदा उचलू नका, आमची चूक कधीनाकधी आम्ही सुधारू असं देखील मुनगंटीवार म्हणालेत. दरम्यान महाराष्ट्रातदेखील जोतिरादित्य सिंधिया तयार होतील असं देखील सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. 

काय म्हणालेत सुधीर मुनगंटीवार :

आज विधानसभेचं कामकाज सुरु असताना सुधीर मुनगंटीवार बोलत होते, दरम्यान भाजपाच्या काही विरोधकांनी 'तुम्ही शिवसेनेला फसवलं' अशी घोषणा दिली. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. "आम्ही, आम्ही फसवलं. आम्ही चूक केली, आमच्या चुकीचा एवढा मोठा फायदा तुम्ही उचलू नका. एकदिवस ती चूक दुरुस्त होईल. कोणीनाकोणी जोतिरादित्य सिंधिया महाराष्ट्रातही येईल, लक्षात ठेवा. हसनभाई, पण आम्ही तुमच्यासारखं वागणार नाही. आम्ही मदत करू हसनभाई, आम्ही राजकारण करणार नाही. आमचं राजकारण सुडाचं राजकारण नाही, आमचं राजकारण हे जनहिताचं असेल, आमचं राजकारण हे सन्मानाचं असेल. आमचं राजकारण स्थगितीचं असणार नाही, असं देखील सुधीर मुनगंटीवार म्हणालेत.  

थोडं मागे जाऊयात : 

लोकसभा निवडणुकीत जेंव्हा युतीची चर्चा झाली तेंव्हा मातोश्रीवर उद्धव ठाकरे, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्रिपदासाठीचा फॉर्म्युला ठरला होता ,असं उद्धव ठाकरे म्हणत होते. यानंतर महाराष्ट्रात गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्यात. सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा वाद उफाळून आला तो म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा. शिवसेना अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर ठाम होती, तर दुसरीकडे भाजपकडून असा 'वादा' कधीही केलेला नाही असं सातत्याने सांगण्यात येत होतं. यानंतर पुढे जे महारभारात घडलं हे आपण सर्वांनी पाहिलंय आणि अनुभवलंय. अशात एक प्रश्न अनुत्तरित होता तो म्हणजे शिवसेना भाजपच्या भांडणात खरं कोण बोलतोय हा.

दरम्यान आज भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आम्ही फसवलं असं म्हणत, "आम्ही चूक केली आमच्या चुकीचा एवढा मोठा फायदा तुम्ही उचलू नका" असं बोलून दाखवलंय.  

ex finanace minister of maharashtra said yes we betrayed but no one should take advantage of it

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com