पडघ्याच्या सरपंचपदी सुगंधा पारधी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

पडघा : भिवंडी तालुक्‍यातील पडघा ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सुगंधा पारधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरपंच पराग पाटोळे हे वैयक्तिक कामासाठी रजेवर गेल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प होऊ नये म्हणून शुक्रवारी ग्रामसचिवालय सभागृहात पार पडलेल्या मासिक सभेत ग्रामविकास अधिकारी अनिल दांडकर यांनी प्रभारी सरपंचपदाचा कार्यभार उपसरपंच सुगंधा पारधी यांच्याकडे सोपवला.

या वेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य डॉ. संजय पाटील, मनोहर आरज, अश्‍विनी तेलवणे, ज्योती जाधव, रेणुका पाटील, प्रणाली बिडवी, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ जाधव, सुरेश पारधी, पद्मण पाटील यांच्यासह नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugandha paradhi is new Sarpanch of Padagha