मुंबई - ऊसतोड कामगारांसाठी राज्य सरकारकडून ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ’ २०१९ मध्ये स्थापन करण्यात आले. मात्र स्थापनेपासून आजतागायत या महामंडळाला राज्य सरकारने एक रुपयाही दिलेला नाही. त्यामुळे, दिवसभर घाम गाळून ऊस तोडणाऱ्या कामगारांसाठी विविध योजना राबविण्यासाठी स्थापन केलेल्या या महामंडळाला सरकारने वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.