तरुणीचा बदलापूरनजीक आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

बदलापूर : बदलापूर वालिवली गाव परिसरातील उल्हास नदी पुलावरून एका तरुणीने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बुडणाऱ्या तरुणीला बाहेर काढून तिला वाचवले.

शनिवारी (ता. २६) दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास एका स्थानिक तरुणीने वालिवली पुलावरून उल्हास नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले.

तरुणी बुडत असताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात उडी मारून त्या तरुणीला पाण्याबाहेर काढले. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तिच्यावर प्राथमिक उपचार 
करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The suicide attempt of a girl near Badalapur