Mumbai : मुंबईत दररोज होतायेत ४ आत्महत्या; NCRBच्या अहवालातून खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide

Mumbai : मुंबईत दररोज होतायेत ४ आत्महत्या; NCRBच्या अहवालातून खुलासा

मुंबई : Mumbai NCRB Suicide Data: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दररोज 4 लोक आत्महत्या करत असल्याचं नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून (NCRB) समोर आलं आहे. मागील दोन वर्षांत आत्महत्यांच्या घटनांमध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे.

तज्ज्ञानुसार दररोज 80 प्रकरणे येतात ज्यामध्ये कोणीतरी आपला जीव घेण्याचा प्रयत्न करतो. मुंबईत अनेक लोक बाहेरून कामानिमित्त येतात. यामुळे अनेक लोक तणाव आणि एकाकीपणात असतात.

मानसशास्त्रज्ञ दीप्ती पुराणिक यांनी सांगितले की, नैराश्यातून जाणारे बहुतेक लोक तरुण असतात. सायबर बुलिंगमुळे अनेक रुग्ण त्रस्त राहतात. अशा लोकांशी बोलावे. एका कॉलेजमध्ये शिक्षक असलेल्या आलोकने सांगितले की, तरुणांमध्ये त्यांच्या प्रतिमेबद्दल खूप चिंता आहे. तसेच वर्गमित्रांचा दबाव, मानसिक तणाव, मित्रांसोबतचे मतभेद यामुळे अनेक तरुण आत्महत्येचा विचार करतात. तरुणांनी आपल्या प्रियजनांशी बोलत राहिले पाहिजे. तुमच्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांवर सजग राहावे, असंही पुराणिक यांनी म्हटलं.

MCRB डेटा

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या संशोधनानुसार 2021 मध्ये एकूण 1 लाख 64 हजार 33 आत्महत्येच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.

सन 2017 मध्ये ही संख्या 1 लाख 29 हजार 887 (9.9%) होती जी 2021 मध्ये वाढून 1,64,033 (12.0%) झाली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक २२ हजार २०७ जणांनी आत्महत्या केल्या आहेत.

तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 14 हजार 966 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये १३ हजार ५६ लोकांनी स्वतःचा जीव घेतला.

टॅग्स :Mumbai Newscrime