‘त्यांनी’आत्महत्येस हे जबाबदार म्हणत...घेतला गळफास!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

राज्यात सर्वत्र सामूहिक आत्महत्येच्या घटना घडत असतानाच डोंबिवली शहरानजीक असलेल्या वाकळण गावही आज अशाच एका घटनेने हादरून गेले. सोमवारी (ता. २) वाकळण गावातील पाटील दाम्पत्याने आपल्या लहान मुलीसह गळफास लावून आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

ठाणे : राज्यात सर्वत्र सामूहिक आत्महत्येच्या घटना घडत असतानाच डोंबिवली शहरानजीक असलेल्या वाकळण गावही आज अशाच एका घटनेने हादरून गेले. सोमवारी (ता. २) वाकळण गावातील पाटील दाम्पत्याने आपल्या लहान मुलीसह गळफास लावून आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पती शिवराम रामा पाटील, पत्नी दीपिका पाटील आणि पाच वर्षांची मुलगी अनुष्का पाटील अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. दरम्यान, जमिनीच्या वादातूनच आत्महत्या झाल्याचा आरोप पत्नीच्या माहेरकडील नातेवाईकांनी केला आहे.

ही बातमी वाचली का? प्रदूषणामुळे माणूसच नव्हे तर, पशू-पक्षीही घायकुतीला..! 

आत्महत्या करण्यापूर्वी शिवराम आणि दीपिका यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘घरातील कुटुंबीयांचा आपल्याला त्रास होत आहे. आमच्या तिघांच्या आत्महत्येस घरातील सर्व जबाबदार आहेत,’ असा उल्लेख करून चिठ्ठीत १३ कुटुंबीयांची नावे नमूद करण्यात आली आहेत. पत्नीने ही चिठ्ठी माहेरकडील मंडळींना व्हॉट्‌सॲपवर पाठवून १३ दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. या घटनेमुळे गावात सोमवारी तणावाचे वातावरण होते; मात्र पाटील कुटुंबीयांना नेमका कोणता त्रास होता याबाबतची अधिकृत आणि ठोस माहिती देण्याचे पोलिसांनी टाळले. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.  दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दीपिका यांच्या माहेरकडील स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील यांनी डायघर पोलिस ठाण्यात धाव घेत दोषींवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. 

ही बातमी वाचली का? नागरिकांना फोन करण्यासाठी जावे लागते...२० किलोमीटर!  

जमिनीचा वाद? 
जमिनीच्या वादातूनच आत्महत्येचा प्रकार घडल्याचा आरोप मुलीचे नातेवाईक सुषमा पाटील यांनी केला आहे. वर्षभरापासून त्यांना त्रास दिला जात होता. पाटील कुटुंबीयांना घरदेखील बांधायचे होते, असे सुषमा यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide note accusing family of suicide in Dombivali

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: