वाशी भरावप्रकरणी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना समन्स

वाशी भरावप्रकरणी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना समन्स
वाशी भरावप्रकरणी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना समन्स

नवी मुंबई : वाशी येथील सायन-पनवेल महामार्गाजवळील खारफुटीवर झालेल्या भरावाची दखल घेत, कांदळवन संरक्षण व संवर्धन संनियंत्रण समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना (पीडब्ल्यूडी) समन्स बजावत समितीच्या पुढच्या बैठकीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. खारफुटीवरील भराव काढण्याबाबत वारंवार सूचना करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने या सूचना देण्यात आल्या.

कांदळवन संरक्षण व संवर्धन संनियंत्रण समितीची बैठक नुकतीच झाली. या समितीकडे श्री एकविरा आई प्रतिष्ठान आणि नेचर कनेक्‍ट या दोन संस्थांनी, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वाशी गावालगत असलेल्या खारफुटीवर टाकण्यात येणाऱ्या राडारोड्याबाबत सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. या परिसरात महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्या दरम्यान निर्माण होणारा राडारोडा खारफुटीला लागूनच टाकण्यात आला. यापूर्वी झालेल्या बैठकींमध्ये हा राडारोडा काढण्याच्या सूचना कांदळवन संरक्षण व संवर्धन संनियंत्रण समितीने संबंधित विभागाला दिल्या होत्या. तसेच या ठिकाणचे सर्वेक्षणही करण्यात आले होते; मात्र समितीच्या सूचनांकडे विभागाने कानाडोळा केल्याने अखेर ठाणे तहसीलदारांना पुढच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य व कार्यकारी अभियंत्यांना हजर राहण्यास कळवावे, असे सांगण्यात आले. 

मानखुर्दजवळील खारफुटीच्या पट्ट्यात भराव टाकला जात आहे. त्या भरावाचे सपाटीकरण करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जात आहे. आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आहोत. 
- बी. एन. कुमार, संचालक, नेचर कनेक्‍ट. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com