सनबर्न फेस्टिव्हलला सशर्त परवानगी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

मुंबई - पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचे पालन करावे; त्यावर पोलिस आणि राज्य सरकारने देखरेख करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 28) दिले आहेत.

कार्यक्रमाचा आवाज 75 डेसिबलपेक्षा कमी राहील, याची खबरदारी आयोजकांनी घ्यावी, असेही न्यायालयाने बजावले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची जबाबदारी सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांनी घ्यावी. नियमांचा भंग झाल्याचे आढळल्यास याचिकाकर्त्यांना पुन्हा उच्च न्यायालयात येण्याची मुभा आहे, असे सुटीकालीन न्यायाधीश भारती डांगरे यांनी सांगितले. ही याचिका कार्यक्रमाच्या ऐन तोंडावर आली नसती, तर ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावरून परवानगी नाकारली असती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sunburn Festival Permission High Court