

Mumbai Local Train Megablock
ESakal
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रविवारी (ता. १५) मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे ते कल्याण अप-डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप-डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.