तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

मुंबई - ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी (ता. 2) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई - ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी (ता. 2) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप-जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यानची अप-जलद मार्गावरील वाहतूक अप धीम्या मार्गावरून करण्यात येईल. या कारणास्तव लोकल 20 मिनिटे उशिराने धावतील. तसेच डाऊन जलद मार्गावरील लोकलना सकाळी 10.08 ते दु. 2.42 या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबा देण्यात येईल. त्याचप्रमाणे अप मार्गावरील 50104 रत्नागिरी-दादर पसेंजर दिवा स्थानकापर्यंतच चालवण्यात येईल.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी दुपारी 4.10 पर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरील कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 पर्यंत बंद राहील. सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येतील.

पश्‍चिम रेल्वे मार्गावर अंधेरी ते वांद्रे अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 10.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक अप आणि डाऊन धीम्या मार्गावरून चालवण्यात येईल.

Web Title: sunday megablock on railway route