उद्या रविवार! पश्चिम आणि मध्य रेल्वेवर असा असेल मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

भाग्यश्री भुवड
Saturday, 12 September 2020

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गांवर रविवारी 13 सप्टेंबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक नसणार आहे.

मुंबईः उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गांवर रविवारी 13 सप्टेंबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक नसणार आहे. त्यामुळे प्रवाशांना हार्बर मार्गांवरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

मध्य रेल्वेच्या मुख्या मार्गांवरील ठाणे ते घाटकोपर दरम्यान 5-6 व्या रेल्वे मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यत तर घाटकोपर ते लोकमान्य टिळक टर्मिनल दरम्यान 5-6 व्या रेल्वे रुळाचे काम करण्यासाठी दुपारी 1 ते 2.30 आणि दुपारी 3.15 ते संध्याकाळी 6.45 वाजेपर्यत,तसेच दिवा ते कल्याण दरम्यान 5-6 व्या रेल्वे मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 2.15 वाजेपर्यत काम करण्यात येणार आहे. 

अधिक वाचाः  भाजप नेते किरीट सोमय्या यांचा राज्य सरकारवर निशाणा, वाचा सविस्तर

यामुळे मेन लाईनवरील स्पेशल लोकल गाड्यांची वाहतुक सुरळित सुरु राहणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतुक जलद मार्गावरुन धावणार आहे. परिमामी राममंदिर स्थानकात लोकल थांबणार नाहीत. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि आपला प्रवास करावा असे आवाहन मध्य - पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

हेही वाचाः  शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या माथेफिरुला अटक

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

 Sunday megablocks Western and Central Railways know the schedule


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunday megablocks Western and Central Railways know the schedule