रविवार ठरला प्रचारवॉर!

रविवार ठरला प्रचारवॉर!
रविवार ठरला प्रचारवॉर!

नवी मुंबई : २१ तारखेला होणाऱ्या मतदानामुळे वाट्याला आलेल्या (ता. १३) एकमेव रविवारचा प्रचारासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी पुरेपूर वापर केला. सुट्टी असल्याने घरी असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच त्यांना आकर्षित करण्याकरिता भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी प्रचारासाठी बेलापूर ते वाशी येथील बीजेपी कार्यालयादरम्यान मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते. काँग्रेस-आघाडी काँग्रेसचे उमेदवार अशोक गावडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी हे स्टार प्रचारक आज रिंगणात उतरले होते. त्यांनी नेरूळ येथे सभा घेतली. तसेच आघाडीचे ऐरोलीतील उमेदवार गणेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी वाशी ते दिघादरम्यान दुचाकी रॅली काढली होती. त्यामुळे प्रचारात नवी मुंबईचे वातावरण आज ढवळून निघाले होते.

२१ ऑक्‍टोबरला सोमवारी मतदान होणार असल्याने २० ऑक्‍टोबरच्या रविवारी प्रचारास बंदी असणार आहे. त्यामुळे त्या रविवारी कोणत्याही पक्षातील उमेदवाराला प्रचार करण्यास मनाई असेल. त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी १३ ऑक्‍टोबरच्या रविवारचा प्रचारासाठी पूर्ण वापर केला. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांनी सकाळपासून दुपारपर्यंत घरी असलेल्या मतदारांना प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन भेटी-गाठी घेतल्या. त्यानंतर संध्याकाळी एका रॅलीचे आयोजन करून नेरूळ येथील अमोल मिटकरींच्या सभेत तिची सांगता झाली. यादरम्यान वाशीतून दिघा दरम्यान गणेश शिंदेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढली होती. मंदा म्हात्रे यांच्या प्रचारासाठीही शनिवारपासून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. रविवारी किल्ले गावठाण ते वाशीतील बीजेपी कार्यालयादरम्यान भाजपने दुचाकी रॅली काढली होती. पामबीच मार्गे, नेरूळ, शिरवणे, करावे, सानपाडा मोराज सोसायटी असा प्रवास करीत या रॅलीची बीजेपी कार्यालयाजवळ सांगता झाली. या रॅलीदरम्यान म्हात्रे यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मनसेतर्फे रिंगणात उभे असलेले उमेदवार गजानन काळे यांनी नेरूळमध्ये पायी प्रचार करत सेक्‍टर १६ व १८ मध्ये घरोघरी जाऊन मतदारांना गाठले. ऐरोली मतदारसंघात मनसेचे उमेदवार नीलेश बाणखिले यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी-गाठी घेतल्या. भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांनी कोपरखैरणे, घणसोली, घरोंदा भागात पदयात्रेमार्फत प्रचारावर भर दिला. वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. प्रकाश ढोकणे यांनीही रविवारी घरी असलेल्या मतदारांची घरोघरी जाऊन भेट घेत प्रचार करण्यावर भर दिला. 

भाजपची दुचाकी रॅली 
रविवारी किल्ले गावठाण ते वाशीतील बीजेपी कार्यालयादरम्यान भाजपने दुचाकी रॅली काढली होती. पामबीच मार्गे, नेरूळ, शिरवणे, करावे, सानपाडा मोराज सोसायटी असा प्रवास करीत या रॅलीची बीजेपी कार्यालयाजवळ सांगता झाली. या रॅलीदरम्यान मंदा म्हात्रे यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. 

प्रत्यक्ष भेटीगाठींवर उमेदवारांचा भर
मतदानापूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने, सुट्टी असलेल्या मतदारांना थेट भेटण्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी भर दिला. २१ ऑक्‍टोबरला सोमवारी मतदान होणार असल्याने २० ऑक्‍टोबरच्या रविवारी प्रचारास बंदी असणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांनी घरी असलेल्या मतदारांना प्रत्यक्ष जाऊन भेटी घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com