

Anand Paranjpe
ESakal
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ठाणे-पालघर पट्ट्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. विधान परिषदेचे तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या आनंद परांजपे यांनी अखेर पक्ष नेतृत्वाविरोधात नाराजी उघडपणे व्यक्त करत हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.