तटकरे, मुंडे वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या भेटीला, मुंबईत राजकीय खलबतं जोरात

सुमित बागुल
Friday, 14 August 2020

मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवाररांचे निकटवर्तीय सुनील तटकरे, त्यांच्या कन्या आणि मंत्री आदिती तटकरे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पोहोचलेत

मुंबई :  मुंबईत गेले तीन दिवस मोठया राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. बुधवारी दुपारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपलेच नातू पार्थ पवार यांना उद्देशून अत्यंत महत्त्वाची कमेंट केली. त्यामध्ये शरद पवार यांनी पार्थ पवारांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केलेल्या CBI चौकशीच्या मागणीला कवडीची किंमत देत नसल्याचं म्हंटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वातावरण चांगलंच तापलंय. अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेणं, त्यानं नंतर सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवारांची भेट घेणं आणि काल स्वतः पार्थ पवारांनी 'सिल्व्हर ओक'वर जाणं अशा काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात.

ब्रेकिंग - गणपतीसाठी रेल्वेने कोकणात जाता येणार; CSMT, LTT, मुंबई सेंट्रल तर वांद्रे टर्मिनसमधून सुटणार गाड्या

दरम्यान या घडामोडीचे सत्र आजही संपण्याचं नाव नाहीये. कारण मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवाररांचे निकटवर्तीय सुनील तटकरे, त्यांच्या कन्या आणि मंत्री आदिती तटकरे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पोहोचलेत. ही बैठक काहीच वेळापूर्वी संपलेली आहे. शरद पवारांनी नोंदवलेल्या आपल्या मतानंतर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार नाराज असल्याचं समजतंय. काल 'सिल्व्हर ओक'वर पार्थ पवार गेले होते. त्यांची दोन तास सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा देखील झाली. मात्र त्यातून फारसं काही निष्पन्न झालं नाही असंच समजतंय.

INSIDE NEWS : काल पार्थ पवार सिल्व्हर ओक वर गेल्यावर तिथं घडलं काय ?

दरम्यान, आज सकाळपासून शरद पवार यांच्या भेटायला सुनील तटकरे, त्यांच्या कन्या आदिती तटकरे आणि धनंजय मुंडे हे नेते आलेले पाहायला मिळालेत. त्यामुळे आता अजित पवार समर्थक शरद पवारांशी बोलतायत का आणि शरद पवारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत का ? असा प्रश्न  उपस्थित केला जातोय. दरम्यान आता ही मिटिंग संपली असून सामाजीय न्याय विभागाच्या कामासंदर्भात शरद पवारांना भेटण्यास आल्याचं धनंजय मुंडे म्हणालेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

sunil tatkare aaditi tatkare and dhanjay munde met sharad pawar at yb center


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunil tatkare aaditi tatkare and dhanjay munde met sharad pawar at yb center