समाजमाध्यमांवर महाराष्ट्र पोलिसांना पाठबळ; मान्यवरांनी ठेवलाय लोगोचा डीपी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

  • राज्यातील सव्वादोन लाख पोलीसांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्यांच्या सन्मानार्थ सर्वांनी समाज माध्यमावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. या आवाहनाला नागरिक आणि मान्यवरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
  • शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, आनंद महिंद्रा, सलमान खान, रणवीर सिंग, अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, अजय देवगण यांनी महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवला आहे. 

मुंबई : राज्यातील सव्वादोन लाख पोलीसांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्यांच्या सन्मानार्थ सर्वांनी समाज माध्यमावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. या आवाहनाला नागरिक आणि मान्यवरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, आनंद महिंद्रा, सलमान खान, रणवीर सिंग, अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, अजय देवगण यांनी महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवला आहे. 

ही बातमी वाचली का? ...तर साडेसहा लाख नागरिकांचे जीव वाचवता येतील! दिल्ली आयआयटीचा अहवाल

कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक सुनील कलगुटकर यांचे कोरोनाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहताना गृहमंत्र्यांनी राज्यात आणखी सात पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. अनेक पोलिस कर्मचारी व अधिकारी कोरोनाबाधित आहेत. या अतिशय कठीण काळात पोलिस दुप्पट क्षमतेने कार्य करत आहेत. त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी व सर्व समाज त्यांच्यासोबत असल्याचे दाखवून देण्यासाठी मी समाज माध्यमावर पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवणार आहे. सर्व नागरिकांनी या पद्धतीने पोलिसांना पाठबळ द्यावे, असे देशमुख यांनी म्हटले होते. 

ही बातमी वाचली का? घरपोच भाजीपाला उपक्रमाला उत्तम प्रतिसाद

आपले पोलिस दल कोणत्याही संकटाच्या काळात जिवाची पर्वा न करता जनतेच्या संरक्षणासाठी उभे असते. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातही महाराष्ट्र पोलिसांनी जनतेचे रक्षण केले आहे. आता कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या पोलिसांना सर्वांनी त्यांना साथ द्यावी, अशी विनंती देशमुख यांनी केली होती. त्यानुसार राजकीय, मनोरंजन, क्रीडा, उद्योग, सामाजिक आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी समाज माध्यमांवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवला. त्याबद्दल गृहमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत 

ही बातमी वाचली का? मजुरांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे भरणार; राज्य सरकारचा निर्णय

यांचा पोलिसांना सलाम 
शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, आनंद महिंद्रा, सलमान खान, रणवीर सिंग, अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, अजय देवगण, वरुण धवन, सुनील शेट्टी, करण जोहर, कतरिना कैफ, दिया मिर्झा, साजिद नडियादवाला, तलत अजीज, पिनाज मसानी, नीता लुल्ला, लुबना ऍडॅम्स. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Support to Maharashtra Police on social media; DP of the logo placed by the dignitaries