स्थलांतरीतांचा अशोक गावडे यांना आधार

स्थलांतरीतांचा अशोक गावडे यांना आधार
स्थलांतरीतांचा अशोक गावडे यांना आधार

नवी मुंबई : स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदाच घाटावरचा उमेदवार नवी मुंबईत आमदारकीची निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या संधीतून या सर्व समाजाला एकवटण्यासाठी उपयोग करणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान केले. केवळ घाटावरचा नाही तर कोकणातून नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांना मी माझ्या पाठीशी एकवटण्याचा प्रयत्न करणार असून, सरकारच्या जास्तीत जास्त योजनांचा त्यांना फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

नवी मुंबईचे आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल आणण्याची गरज गावडेंनी व्यक्त केली. नवी मुंबईत समाजसेवा करणारे एकही रुग्णालय नाव घेण्यासारखे नाही. रुग्णाच्या उपचाराचे बिल पाहून त्याचे नातेवाईक आजारी पडतात. एवढे बिल येते. पालिकेने रुग्णालयांच्या आलिशान इमारती बांधल्या आहेत. आम्ही आरोग्यासाठी एक चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळण्यासाठी ऑनलाईन ॲप तयार केले आहे. या माध्यमातून आरोग्य सुविधा देणार असल्याचा मानस गावडे यांनी यावेळी व्यक्त केला. स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवंत मुलांना चांगले मार्गदर्शन मिळावे, याकरीता एका चांगल्या दर्जाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडली. 

शहरात अनेक भागांत चांगले कौशल्य असलेली मुले क्रिकेट, कबड्डी, खो-खो व कुस्ती खेळतात. मात्र, त्यांच्या पाठीमागे कोणी नसल्याने त्यांच्यासाठी क्रीडा संकुले तयार करण्याचा मानस आहे. शहरातील बेकायदा झोपड्यांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी. तसेच पुन्हा झोपडी होऊच द्यायची नाही, असा एक निश्‍चय करू या, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सिडकोने अगदी खुराड्यासारखी घरे लोकांना दिली आहेत. अशा सिडकोमागे ईडी का लागत नाही? असा प्रश्‍न गावडेंनी उपस्थित केला. 

हजारो तरुणांचे रोजगार गेले
केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील हजारो कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे हजारो तरुणांचे रोजगार निघून गेले आहेत. सरकारचा निधी येत नसतो, तो आणावा लागतो. मात्र, त्यात आपल्याला अपयश आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com