पाली एसटी स्थानकात प्रवाशांना पत्र्याच्या शेडचा आधार

एसटी स्थानकाच्या धोकादायक इमारतीला पर्याय म्हणून शेड उभारण्यात आली आहे. प्रशासनाच्‍या तात्‍पुरत्‍या उपायामुळे प्रवाशांमध्‍ये संतापाचे वातावरण आहे.
एसटी स्थानकाच्या धोकादायक इमारतीला पर्याय म्हणून शेड उभारण्यात आली आहे. प्रशासनाच्‍या तात्‍पुरत्‍या उपायामुळे प्रवाशांमध्‍ये संतापाचे वातावरण आहे.

मुंबई : पाली एसटी बसस्थानकाची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे पालीमध्‍ये प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आला आहे. महामंडळाने धोकादायक इमारतीला पर्याय म्हणून स्थानकात तात्‍पुरता एका बाजूला पत्र्याची शेड उभारली आहे.  

पाली शहरातील बसस्थानकाच्या ४० वर्षांहून जुन्या इमारतीची डागडुजी करण्यात आलेली नाही. जर्जर झालेल्या इमारतीमध्ये सतत कोसळणारे छत व भिंतीचे प्लास्टर, परिसरात साचलेले सांडपाणी, मोडकळीस आलेली बाकडी, बंद पंखे, पिण्याच्या पाण्याचा अभाव, बंद पडलेले कॅंटीन, स्वच्छतागृहाची दुरवस्था, स्थानकातील खड्डे अशा अनेक समस्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.  

धोकादायक झालेली ही इमारत कोसळून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते. बसस्थानकाच्या इमारतीची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीच्या मागणीसाठी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा आंदोलने केली. त्यामुळे एसटी महामंडळाने अखेरीस बसस्थानकाच्या आवारात पत्र्याची शेड बांधली; परंतु नियंत्रण विभाग, कार्यालय, कर्मचारी निवास याच धोकादायक इमारतीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका कायम आहे.

या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडाळने पाली बसस्थानकासाठी सुसज्ज इमारत उभारण्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
धोकादायक इमारतीला पर्याय म्हणून पत्र्याची शेड उभारली, हे चांगले झाले. प्रवाशांची मोठी संख्या पाहता ही शेड अपुरी ठरण्याची शक्‍यता आहे. बसस्थानकासाठी लवकरात लवकर सुसज्ज इमारत बांधावी, अशी मागणी पालीतील नागरिक कपिल पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

कॉलेजला जाण्यासाठी येथूनच बस पकडते. स्थानकात कोणतीच सोय नाही. पत्र्याची शेड उभी राहत असल्याने असे वाटतेय की, कदाचित बसस्थानक इमारत दूरस्थ होईल. त्यामुळे आनंदच आहे. फक्त हे काम लवकर झाले पाहिजे, अशी मागणी विद्यार्थिनी सोनिया माळी यांनी केली.

शेडचे काम परिवहन मंडळाच्या इंजिनियरिंग विभागाकडून होत आहे. कंट्रोल पॉईंट बांधण्याची मागणी केली आहे. काम कधी पूर्णत्वास येणार याची माहिती आमच्याकडे नाही. 
- विलास तांबट, वाहतूक नियंत्रक, पाली बसस्थानक 

धोकादायक इमारतीला पर्याय म्हणून पत्र्याची शेड उभारली हे चांगले झाले. मात्र प्रवासीसंख्या पाहता शेड अपूर्ण ठरू नये. बसस्थानकाची सुसज्ज इमारत लवकरात लवकर बांधण्यात यावी. सध्या तिथे पाणी साठत असल्याने तळे होत आहे. 
- कपिल पाटील, नागरिक 

पाली बसस्थानकातून नियमित प्रवास करते. धोकादायक इमारत असल्याने इथे उभे राहणे खूपच भीतिदायक होते. प्रवाशांसाठी शेड उभारल्यामुळे किमान आम्हाला सुरक्षित वाटणार आहे. ही शेड लवकरात लवकर व्यवस्थित पूर्ण झाली पाहिजे. 
- छाया म्हात्रे, प्रवासी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com