निकाल तर ऐतिहासिक; मात्र त्याचा राजकीय वापर नको, वाचा निकालावर वकीलांची प्रतिक्रिया

सुनिता महामुणकर
Wednesday, 19 August 2020

घटना घडते एका राज्यात, फौजदारी गुन्हा नोंदविला जातो दुसऱ्या राज्यात आणि तपास करणारी यंत्रणा तिसरी, असे इतिहासात प्रथमच झाले आहे.

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने आज सीबीआयकडे सुपुर्द केला. न्यायालयाने स्वतःचा विशेषाधिकार वापरून दिलेल्या या ऐतिहासिक निकालामुळे जनभावनेचा आदर राखला गेला आहे, अशी समाधानकारक प्रतिक्रिया वकील वर्गातून व्यक्त केली जात आहे.

पार्थ पवारांच्या 'सत्यमेव जयते' ट्विटवर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणतात पार्थ यांनी....

न्यायालयाने आज दिलेला निकाल ऐतिहासिक आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ विधीज्ज्ञ उज्वल निकम यांनी दिली. घटना घडते एका राज्यात, फौजदारी गुन्हा नोंदविला जातो दुसऱ्या राज्यात आणि तपास करणारी यंत्रणा तिसरी, असे इतिहासात प्रथमच झाले आहे. विविध प्रकारचे कंगोरे या प्रकरणात आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल येत्या काळात दूरगामी परिणाम करणारा आणि नवा पायंडा घालणारा ठरणार आहे, असे निकम म्हणाले. मात्र, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी या निकालाचा राजकीय पक्षाकडून भविष्यात वापर होता कामा नये, अशी अपेक्षादेखील आहे, असे ते म्हणाले.

महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची मुदत वाढली; आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयाविषयी जाणून घ्या

सुशांतसिंहच्या मृत्यूबाबत देशभरात संभ्रम निर्माण झाला आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांबाबतही शंका उपस्थित केली जात होती. या शंकांचे निरसन पोलिसांकडून केले गेले नाही.  मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यू नोंदवला असला तरी त्यामध्येही चौकशीला विलंब केला. यामुळे  अधिकच प्रश्न निर्माण झाले, असेही ते म्हणाले.

CBI सर्वात आधी 'या' गोष्टी घेणार स्वतःच्या ताब्यात, आजच किंवा उद्या CBI ची टीम मुंबईत होणार दाखल

या निकालातून जनमताचा आदर केला गेला आहे. त्यामुळे हा फैसला स्वागतार्ह आहे. मात्र आता यावर पारदर्शकपणे आणि  सक्षमपणे तपास व्हायला हवा. सर्वोच्च न्यायालयाने ही अशाच तपासाची अपेक्षा केली आहे, त्यामुळे ती पूर्ण व्हायला हवी, असे मत ज्येष्ठ विधीज्ज्ञ उदय वारुंजीकर यांनी व्यक्त केली.

तबलिगी जमात प्रकरण: मुंबईतल्या 'या' चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु

संपूर्ण प्रकरणात होत असलेल्या घडामोडी पाहता मुंबई पोलिस केवळ आत्महत्या या एकाच बाजूने तपास करीत होते. त्यापुढे जाण्याचा किंवा वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याचा, गुन्हा नोंदविण्यावर त्यांनी काही केले नाही. अधिकाऱ्याला क्वारंटाईन करणे, माध्यमातून येणारी राजकीय विधाने यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे सीबीआय तपासाचा न्यायालयाचा निर्णय समाधानकारक आहे, असे एॅड. आशिष सातपुते म्हणाले.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supreme court gives historical decision over ssr case but dont use it for politics says advocates