मराठा आरक्षणाअंतर्गत पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

ऐन कोरोनाच्या लढाईतही मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय आल्याने मराठा समाजाला मोठा दिलासा मिळालाय.

मुंबई :  मराठा आरक्षणसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येतेय. ऐन कोरोनाच्या लढाईतही मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय आल्याने मराठा समाजाला मोठा दिलासा मिळालाय. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय.

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावलीये. त्यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झालाय. यापूर्वी नागपूर खंडपीठाने मे 2019 मध्ये याबाबत  निर्णय देताना पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही. असा निर्णय दिला होता. या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.  

सर्वात मोठा दावा; कोरोनावर होमियोपॅथीचे उपचार गुणकारी, गोळ्यांचं नाव आहे...

याचसोबत आणखीन एक याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आलीये. ही याचिका मराठा आरक्षणांतर्गत झालेले प्रवेशही रद्द करण्यासंदर्भात होती. दरम्यान ही याचिका देखील न्यायालयाने फेटाळली आहे. 

वैद्यकीय प्रवेशाबाबत कोर्टाने कोट्याही प्रकारची स्थगिती न दिल्याने या निर्णयाचा फायदा वैद्यकीय प्रवेशासाठी जे मराठा विद्यार्थी पात्र आहेत अशाना होणार असल्याचं मराठा नेते विनोद पाटील म्हणालेत. 

या निर्णयामुळे आता शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षात पात्र मराठा मुलांना वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेता येणार आहेत. 

Supreme court of maratha reservation read full story related to PG medical admissions


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme court of maratha reservation read full story related to PG medical admissions