

Highway Safety Drive Supreme Court Orders Removal of Unauthorized Dhabas and Commercial Buildings Within 60 Days
sakal
मुंबई : राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या ‘राईट ऑफ वे’ (रस्त्याच्या हद्दीतील राखीव जागा) क्षेत्रात येणारे सर्व नवीन व जुने अनधिकृत ढाबे, खानावळी आणि व्यावसायिक बांधकामे पुढील ६० दिवसांच्या आत जमीनदोस्त करा, असे स्पष्ट आणि अंतिम निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या ऐतिहासिक आदेशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाद्वारे विशेष शासन परिपत्रक जारी करण्यात आले असून, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना या निर्देशांची तात्काळ आणि तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे बजावण्यात आले आहे.