Supriya Sule
sakal
कळवा : ठाणे शहरात सत्ताधारी पक्षाची सत्ता असताना शहरात पिण्याच्या पाण्यासाठी स्वतःचे धरण नसल्याने पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पाण्याची चोरी होत असून टँकरमाफिया निर्माण झालेत. जर ठाण्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास टँकरमाफिया मोडून काढू. शहरात शिक्षण महाग झाल्याने सर्वसामान्यांना व गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना टॅब वाटू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कळवा येथे केले.