
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊन जवळपास आठवडा उलटला तरी महायुतीतील सत्तेचे गूढ अद्याप उकललेले नाही. जसजसे दिवस पुढे जात आहेत, तसतसे नवीन सरकार स्थापनेबाबतच्या अडचणीही वाढत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे सध्या निश्चित झाले नसले तरी ते भाजपचेच असणार हे जवळपास निश्चित आहे. ५ डिसेंबरला शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होणार आहे. मात्र अशातच मुंबई काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.