मुंबईतल्या ईडी अधिकाऱ्यांचा प्रताप, चक्क जप्त केलेले कंटेनर विकले २ लाखांत

पूजा विचारे
Thursday, 29 October 2020

मुंबईत असलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या गाड्या विकल्याचा आरोप सूरत पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी सूरत ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी आयआरएस अधिकारी प्रवीण साळुंखेंसह आणखी एकाला आरोपी केलंय. आतापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 

मुंबईः मुंबईतील ईडी अधिकाऱ्यांवर सूरत पोलिसांनी काही आरोप केलेत. सूरत पोलिसांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्याच गोरखधंद्याचा पर्दाफाश केला आहे. मुंबईत असलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या गाड्या विकल्याचा आरोप सूरत पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी सूरत ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी आयआरएस अधिकारी प्रवीण साळुंखेंसह आणखी एकाला आरोपी केलंय. आतापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 

गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचीच विक्री करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. धक्कादायक म्हणजे, या सर्व प्रकारात ईडीच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचं समोर आलं आहे. सूरत ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळतेय. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सध्या मुंबईत कर्तव्यावर असलेल्यांमध्ये दोन ईडीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. २०१० बॅचचे आयआरएस अधिकारी प्रवीण साळुंखे आणि ईडी इंस्पेक्टर भेराराम या दोघांना या प्रकरणात आरोपी ठरवण्यात आलं आहे.

अधिक वाचाः  मुंबईत रुग्ण दुपटीचा दरात दिवसेंदिवस वाढ, १४४ दिवसांवर पोहोचला दर

सूरतचे सह पोलिस आयुक्त भार्गव पंड्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी ईडी आणि सीबीआयनं जप्त केलेले ट्रक आणि कंटेर हे भिंत तोडून बाहेर नेण्यात आले होते. या प्रकरणाची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतोष नावाच्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या संतोषची चौकशी केली. चौकशीदरम्यान या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचं उघड झालं. 

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु करत संतोषचा मोबाईल, व्हॉट्सअॅप चॅट तपासलं. यावेळी पोलिसांना संतोषनं प्रवीण साळुंखे यांच्याशी संवाद साधल्याचं समजलं. कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेली वाहनं बाजारात २ लाखांमध्ये विकली होती. यात संतोषला २० ते ३० हजार रक्कम प्रती कंटेनर पैसे मिळत होते. उरलेली सर्व रक्कम ही ईडी अधिकाऱ्यांच्या खिशात जात होते, अशी माहिती भार्गव पंड्या यांनी दिली आहे.

अधिक वाचाः  ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट, दिवसभरात ८५३ नव्या रुग्णांची भर

बँक ऑफ इंडियाच्या रिकव्हरी मॅनेजरनं २०१८ मध्ये सूरतमधील सिद्धी विनायक लॉजिस्टिक विरोधात तक्रार दाखल केली होती. सिद्धी विनायक लॉजिस्टिकनं १२५ कोटींचं कर्ज घेतलं होतं. मात्र त्या कर्जाची परतफेड करण्यात आली नव्हती. त्यामुळे २०७ ट्रक आणि कंटेनर सीबीआय आणि ईडीकडून जप्त करण्यात आले होते. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी कंटेनरचे नंबर प्लेट बदलले आणि बाजारात ते विकले. 

या प्रकरणी संतोषसह आणखी दोन जणांना सूरत ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचे मोबाइल जप्त केले असून डेटा काढून घेण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तसंच लवकरच या दोन्ही अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

surat police busted ed officers racket seized truck sold rs 2 lakh


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: surat police busted ed officers racket seized truck sold rs 2 lakh