Bhiwandi Loksabha: कपिल पाटलांना मतदारांनी रस्त्यावर आणले; बाळ्यामामांची टीका

Bhiwandi Loksabha
Bhiwandi Loksabhasakal

Bhiwandi Loksabha 2024: भाजपचे खासदार कपिल पाटील विजयाची हॅट्रिक करत जास्तीत जास्त मताधिक्य मिळविण्यासाठी गल्लोगल्ली प्रचार करत आहेत. मनसेचे राजू पाटील यांची देखील त्यांनी भेट घेतली आहे. (Raju Patil MNS)

यावरून राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी 2014, 2019 च्या निवडणुकीत पाटील कोणता मोहल्ला, बिल्डिंग मध्ये गेलेले दिसले का आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक रस्त्यावरती कपिल पाटील दिसतात. याचे श्रेय सर्व मतदारांचे आहे. ज्यांनी कपिल पाटील यांना दोन वेळा संधी दिली, आणि तिसऱ्यावेळी रस्त्यावर आणले आहे असे म्हणत म्हात्रे यांनी थेट पाटलांवर निशाणा साधला आहे. ( suresh mhatre balyamama )

Bhiwandi Loksabha
Bhiwandi News: शेख यांचा राजीनामा महायुतीच्या पथ्यावर?, वाचा काय आहे कारण

भिवंडी, कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांची एकत्रित पत्रकार परिषद कल्याण येथे आयोजित केली होती. यावेळी सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय पंचायत राज्य मंत्री आणि महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. विकासाच्या मुद्द्यावर मी ही निवडणूक लढविणार आहे. (Bhiwandi Kalyan Lok Sabha)

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि या भागाचे खासदार कपील पाटील यांनी मागील दहा वर्षात विकासाची कोणतीही कामे केली नाहीत. (MP Kapil Patil)

मी विजयी झाल्यावर या भागातील विकास कामावर फोकस करणार असून प्रत्येक वर्षात काय काम केली व पुढे काय काम करणार याचा लेखाजोखा मांडणार. जो पाटलांनी आतापर्यंत कधी मांडला नाही. कोणाला बोलण्याची संधी मिळणार नाही असे ही म्हात्रे म्हणाले.

Bhiwandi Loksabha
Bhiwandi News: शेख यांचा राजीनामा महायुतीच्या पथ्यावर?, वाचा काय आहे कारण

भिवंडी परिसरात एकही चांंगला रस्ता नाही. सर्वोपचारी रुग्णालय नाही. लोकांना उपचारासाठी ठाणे, मुंबईत जावे लागते. निवडणुका जवळ आल्या की कपील पाटील फक्त कल्याण-मुरबाड-नगर रेल्वेचा विषय उकरून काढून त्या विषयी चर्चा घडवून आणतात. त्यांच्याकडून या विषयीचा पाठपुरावा होत नसल्याने हा रेल्वे मार्ग रखडला आहे, अशी टीका त्यांनी केली.

मी सत्ताधारी पक्षात राहिलो नाही

पक्षांतर वगैरे काही नाही.तीस वर्ष शिवसेनेत काढली, दीड दोन वर्ष राष्ट्रवादीत काढली, मनसेत पण तीन वर्ष काढली. माझा एक इतिहास तुम्ही बघा मी सत्ताधारी पक्षात राहिलो नाही. मी शिवसेनेतून मनसेत गेलो विरोधी पक्ष मनसेतून राष्ट्रवादीत गेलो तेव्हा सत्ता होती पण लगेच विरोधी पक्ष त्याच्यानंतर मी शिवसेनेत जात होतो का नव्हतो जात पण गेलो आता पुन्हा मी विरोधी पक्षात आलोय तेही अशा परिस्थितीत.

Bhiwandi Loksabha
Bhiwandi Crime News: धूम स्टाईलने मोबाईलची चोरी

पाटलांना तिसऱ्या वेळी रस्त्यावर आणले

पाटील यांनी प्रचाराचा धुमधडाका लावला आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे देखील त्यांनी भेट घेतली आहे यावर बोलताना म्हात्रे म्हणाले, 2014 निवडणूक, 2019 निवडणूक कपिल पाटील कुठल्या बिल्डिंगमध्ये, मोहल्ला मध्ये गेले होते का प्रचाराला ? हे मला सांगा. नाही गेले, आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक रस्त्यावरती कपिल पाटील दिसतात. याचे श्रेय सर्व मतदारांचे आहे. ज्यांनी कपिल पाटील यांना दोन वेळा संधी दिली आणि तिसऱ्यावेळी रस्त्यावर आणले आहे.

कल्याण येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी थेट भाजपचे खासदार व महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर खोचक टीका करत निशाणा साधला आहे. याला आता खासदार पाटील कसे उत्तर देतात पहावे लागेल.

Bhiwandi Loksabha
Bhiwandi Loksabha Election : भिवंडीत होणार तिरंगी लढत; वंचितकडून निलेश सांबरेना उमेदवारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com