Bhiwandi News: शेख यांचा राजीनामा महायुतीच्या पथ्यावर?, वाचा काय आहे कारण

Bhiwandi News: शेख यांचा राजीनामा महायुतीच्या पथ्यावर?, वाचा काय आहे कारण

त्यानंतर २०१९ मध्येदेखील भाजपला हा गड कायम ठेवण्यात यश आले | After that, even in 2019, BJP managed to retain this stronghold
Published on


ठाणे, ता. २१ : भिवंडी लोकसभेला यंदा राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे तिसऱ्यांदा विजयाची पताका फडकविण्याच्या तयारीत आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी शरद गटाकडे जागा गेल्याने काँग्रेसचे पदाधिकारी नाराज असतानाच त्यात आता भिवंडी पूर्वतील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील विसंवाद आणि घडामोडी महायुतीच्या पथ्यावर पडणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Bhiwandi News: शेख यांचा राजीनामा महायुतीच्या पथ्यावर?, वाचा काय आहे कारण
Bhiwandi Loksabha: भिवंडी लोकसभा लढणार एमआयएमचा उमेदवार!

ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघापैकी भिवंडी लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. या मतदारसंघावर अनेक वर्षापासून काँग्रेसचे असलेले वर्चस्व मोडीत काढत २०१४ मध्ये भाजपने शिरकाव केला. त्यानंतर २०१९ मध्येदेखील भाजपला हा गड कायम ठेवण्यात यश आले.

यंदा मात्र या गडाला सुरुंग लावण्यासाठी महाविकास आघाडीकडून खेळी खेळत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ही जागा देत, सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने त्यास विरोध दर्शवित पुन्हा पक्षश्रेष्ठींनी या जागेबाबत विचार करावा, अशी मागणी लावून धरली.

Bhiwandi News: शेख यांचा राजीनामा महायुतीच्या पथ्यावर?, वाचा काय आहे कारण
Bhiwandi Loksabha: महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

अशात महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रईस शेख यांनी राजीनामा दिला. शेख यांची या मतदारसंघातील जनसंपर्क पाहता त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराची ताकद वाढली होती. मात्र, त्यांनी राजीमाना दिल्यामुळे महाविकास आघाडीची ताकद कमकुवत तर नाही ना होणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.


कपिल पाटील यांची वाटही खडतर


महायुतीचे उमेदवार कपिल पाटील हे तिसऱ्यांदा विजयाची पताका फडकविण्याच्या तयारीत आहेत. असे असले तरी मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी शीतयुद्ध सुरू होते. दोघांकडून एकमेकांना कोपरखळ्या मारीत आरोप-प्रत्यारोप करीत होते.

Bhiwandi News: शेख यांचा राजीनामा महायुतीच्या पथ्यावर?, वाचा काय आहे कारण
Bhiwandi Crime News: धूम स्टाईलने मोबाईलची चोरी

मात्र, त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचेही समोर आले. तसेच मध्यंतरी शिंदेच्या सेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन कपिल पाटील यांच्यावर आरोप केले होते. भिवंडी मतदारसंघ शिवसेनेलाच द्यावा, अन्यथा आम्ही आगामी निवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराचे काम करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता.

यामुळे यंदाची निवडणूक पाटील यांची वाट खडतर असल्याचे बोलले जात होते. अशातच महाविकास आघाडीत घडणाऱ्या घडामोडी आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमधील विसंवाद कपिल पाटील यांच्या पथ्यावर पडणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Bhiwandi News: शेख यांचा राजीनामा महायुतीच्या पथ्यावर?, वाचा काय आहे कारण
Bhiwandi Loksabha Election : भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com