"...हे तर राजकीय षडयंत्र; कोणाचे हात कुठंपर्यंत पोहोचलेत, हे आम्हांला माहितीये!"

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 9 August 2020

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुंबई : सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी बिहार सरकार आणि केंद्र सरकारकडून राजकारण होत आहे. मात्र मुंबई पोलीस याबाबत सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. तपास पुर्ण झाल्यानंतर यावर टीका करावी, देशात लोकशाही आहे. कोणाचे हात कुठंपर्यंत पोहोचले आहे. हे आम्हांला माहित आहे. असेही राऊत यावेळी म्हणाले.

ही बातमी वाचली का? 200 रुपयांचे पीपीई किट 1500 ते 2000 रुपयांना; खासगी रुग्णालयांची लुटमार थांबेना; नागरिक करताहेत आरोग्यमंत्र्यांना ट्वीट

 
काही लोकांकडून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या प्रकरणाचा राजकीय फायद्यासाठी वापर होत आहे. 40 दिवसांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल होते. सीबीआयकडे प्रकरण सोपवण्याची मागणी करत बिहारचे मुख्यमंत्री यात पडतात. हा घटनाक्रम पाहिल्यावर हा घटनाक्रम कोणीतरी लिहिलाय असे वाटते. मुंबई पोलिसांचे काम स्कॉटलंडच्या पोलिसांच्या तोडीचे आहे. त्यांना तपास करू द्यायचा नाही, म्हणून हे कारस्थान सुरु आहे. पण जे घेराबंदी करत आहेत ते स्वतःच यात अडकतील. असेही राऊत यावेळी म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात राऊत म्हणाले, मराठा उपसमितीतून अशोक चव्हाणांना हटवावे का? हा माझा विषय नाही. यावर मंत्री एकनाथ शिंदे बोलतील. ते त्या समितीत आहेत. सरकार योग्य काय तो निर्णय घेईल. 

ही बातमी वाचली का? अरे देवा! मुंबईतला 'हा' भाग ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट, पालिकेची डोकेदुखी वाढणार?

बिहार पोलिसांवर टीका 
बिहारचे पोलिस महासंचालक एका पक्षाचे नेते होते. त्यांनी निवडणूक लढवली होती. अशा पोलीस अधिकाऱ्यापासून काय अपेक्षा करु शकतो. अशी टीका संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर केली. सुशांतसिंह किती वेळा पाटण्याला गेला होता. चौकशीला वेगळी दिशा देण्याचे षडयंत्र सुरु आहे. सुशांतचे वैयक्तिक जीवन सार्वजनिक केले जात आहे. असेही राऊत यावेळी म्हणाले. 

ही बातमी वाचली का? धक्कादायक ! शुल्लक कारणावरुन नालासोपाऱ्यात अंध व्यक्तीची हत्या; गुन्हेगार अटकेत

कर्नाटक सरकारचा धिक्कार 
बेळगावातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीत हटवला त्या कर्नाटक सरकारचा धिक्कार आहे. यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष बोलत नाही. बेळगावात महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्यांसोबत आंदोलन करायला आम्ही तयार आहोत. ते येणार का हे त्यांना विचारा? असे देखील राऊतांनी म्हटले आहे. 
------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh case is a political conspiracy says Shiv Sena MP Sanjay Raut