esakal | सिने निर्मितीशी संबंधिताला NCB चा समन्स, अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावानंतर आणखीन एक धडक कारवाई 
sakal

बोलून बातमी शोधा

सिने निर्मितीशी संबंधिताला NCB चा समन्स, अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावानंतर आणखीन एक धडक कारवाई 

सुशांत सिंग राजपुत प्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच NCB ने बॉलीवूडमधील चित्रपट निर्मितीशी संबंधित एका व्यक्तीला समन्स पाठवलाय.

सिने निर्मितीशी संबंधिताला NCB चा समन्स, अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावानंतर आणखीन एक धडक कारवाई 

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : सुशांत सिंग राजपुत प्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच NCB ने बॉलीवूडमधील चित्रपट निर्मितीशी संबंधित एका व्यक्तीला समन्स पाठवलाय. याप्रकरणी नुकतीच अभिनेता अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिल्लाच्या भावाला ड्रग्ससह एनसीबीने अटक केली होती.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी पेजथ्री, बॉलीवूड सेलेब्रीटींना ड्रग्स पुरवणाऱ्या रॅकेटचा माग घेणाऱ्या एनसीबीने  याप्रकरणी बॉलिवूडमधील एका व्यक्तीला समन्स पाठवले आहे. हा व्यक्ती चित्रपट निर्मितीशी संबंधित व्यक्ती असून लवकरच त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वी मुंबई, गोवा येथे एनसीबीने शोध मोहिम राबवली होती. याप्रकरणी करमजीत सिंग, ड्वेन फर्नाडीस, संकेत पटेल, अंकुश अनरेजा, संदीप गुप्ता आणि व आफ्ताब फतेह अन्सारी या सहा जणांना एनसीबीने अटक केली होती. त्यातील अंकुश अनरेजा हा हॉटेल व्यावसायिक असून पवईतील एका बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. याशिवाय करमजीत आनंद उर्फ केजे दोघेही मोठे ड्रग्स वितरक आहेत. केजे याने अंधेरीतील क्लबमध्ये सुशांतला वीड (गांजा) पुरवला होता. तसेच रिया चक्रवरीच्या सांताक्रुझ येथील घरी व सुशांतच्या वांद्रे येथील घरीही केजेने ड्रग्स पोहोचवले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.  

महत्त्वाची बातमी : राज ठाकरे पोहोचलेत लिलावातीमध्ये, ठाकरे कुटुंबियांसाठी भावुक क्षण

एनसीबीने  पेज थ्री सेलिब्रीटींशी संबंधीत अनुज केशवानी या बड्या वितरकाला अटक केल्यानंतर  ड्रग्स पुरवणा-या रॅकेटशी संबंधीत इतरांच्या शोधात आहेत. फैयाज अहमद, कैझान, झैद विलात्रा व अनुज केशवानी यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी धागेदोरे जुळलेले तसेच बॉलीवूड वर्तुळात ड्रग्स पुरवठा करणारे डझनभर वितरक आता अंडरग्राऊंड झाले आहेत. यावेळी मिरांडा आणि शौविक चक्रवर्तीच्या चौकशीत केजेचे नाव पुढे आले होते.

नुकतीच याप्रकरणी एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिल्लाच्या भावाला ड्रग्ससह अटक केली. खार येथील घरी अलफ्रॅझोलन गोळ्यांची एक स्ट्रीप सापडली आहे. तो याप्रकरणी अटक करण्यात आलेला रिक्षा चालक संदीप गुप्ता असल्याचा संशय आहे. त्याशिवाय तो याप्रकरणी अटक अनुज केशवानी व ड्वेन यांच्याही संपर्कात असल्याचा संशय आहे.

महत्त्वाची बातमी :  मुंबई महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढणार? पेडणेकरांविरोधात पोलिसात तक्रार

याशिवाय  डेमेट्रीअॅडेट्स याप्रकरणातील आरोपी कैझानलाही ओळखत होता. त्याने   डेमेट्रीअॅडेट्स हशीश व आईसचा पुरवठा केला होता. त्यानंतर याप्रकरणी त्याचा जबाब नोंदवून एजिसिलाऊस डेमेट्रीअॅडेट्सला अटक करण्यात आली.

sushant singh rajaput case NCB summonsed person working in production of movies