सुशांतसिंग मृत्यू प्रकरण : बडा दिग्दर्शक एनसीबीच्या निशाण्यावर

अनिश पाटील
Friday, 25 September 2020

ड्रग्सबाबतचे सापडलेल्या चॅटशी संबंधीत WhatsApp ग्रुपची ऍडमिन दिपीका असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एनसीबी) रडारवर सध्या बॉलीवूडमधील बडा निर्माता आणि दिग्दर्शक आला आहे. 2019 मध्ये त्याने आयोजीत केलेल्या एका पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन करण्यात आल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी या दिग्दर्शकाच्या संबंधीत एका व्यक्तीची एनसीबीने चौकशी केली. दुसरीकडे अभिनेत्री रकुल प्रितचीही शुक्रवारी चौकशी करण्यता आली. यावेळी रकुल प्रीतने ड्रग्जशी आपला संबंध नसून तिने रियाचे नाव घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. रिया तिच्या घरात ड्रग्ज ठेवत असल्याची कबुली रकुल प्रितने दिली.

याप्रकरणी एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह या बड्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत.

या अभिनेत्रींसह एकूण 7 सेलिब्रिटीजना एनसीबीकडून समन्स पाठविण्यात आले आहे. तसेच आणखी जवळपास 39 सेलिब्रिटी एनसीबीचीच्या रडारवर आहेत. अशावेळी दीपिकाच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी : राऊतांचा रोखठोक सवाल; मारुती कांबळेप्रमाणे आता सुशांत सिंह प्रकरणाचं काय झालं?

WhatsApp ग्रुपची ऍडमिन होती दिपीका ?

ड्रग्सबाबतचे सापडलेल्या चॅटशी संबंधीत WhatsApp ग्रुपची ऍडमिन दिपीका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दिपीकाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच शनिवारी दिपीकाची चौकशी करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या सुरक्षेमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण एनसीबीच्या कार्यालयात येईल दादर पोलीस ठाण्याची एक पथक प्रभादेवीतील बो मोंट या दिपीकाच्या इमारतीबाहेर तैनात करण्यात आले आहे. दीपिका या इमारतीत राहते.

धोकादायक इमारतींचा मुद्दा : हायकोर्टाने दाखल केली सुमोटो याचिका, MMR मधील महापालिकांना विचारला जाणार जाब

सुशांतला रियामार्फतच ड्रग्स पोहोचायचे

अभिनेता सुशांत सिंग याने सेवन केलेले ड्रग्स त्याच्यापर्यंत रिया मार्फत पोहोचले असल्याचे एनसीबीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. हे ड्रग्स रियाला शौविक पुरवत होता. याप्रकरणी एनसीबीने यापूर्वीच काही बड्या ड्रग्स तस्करांना अटक केली आहे.रि याकडून सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांच्या मार्फत सुशांतला पोहोचवले जात असल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

( संपादन - सुमित बागुल ) 

sushant singh rajaput case senior director on the target of NCB


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajaput case senior director on the target of NCB