सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात CBI चं अद्यापही मौन, CBI तपासाचं झालं तरी काय ?  मुंबई उच्च न्यायालयात याचिका

सुनीता महामुणकर
Tuesday, 8 December 2020

चार महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास CBI कडे सुपुर्द केला होता.

मुंबई, ता 8 : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या CBI ने अद्याप मौन बाळगल्यामुळे, सीबीआय तपासाचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

चार महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास CBI कडे सुपुर्द केला होता. मात्र, यामध्ये अद्यापही कोणती विशेष बाब उघड झाली नाही. मुंबई पोलिसांनीही याआधी या प्रकरणात तपास केला होता. मात्र या तपासाला विरोध करून सुशांतच्या वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आता चार महिने CBI तपास करीत आहे. त्यामुळे या तपासाची माहिती सीबीआय ने दाखल करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयात करण्यात आली आहे. मुंबईच्या रहिवासी पूनीत कौर धांडा यांनी एड विनीत धांडा यांच्यामार्फत ही याचिका केली आहे.

महत्त्वाची बातमी चर्चा तर होणारच ! पालघरच्या समुद्रात मासेमाऱ्यांना आढळला उडणारा दुर्मिळ मासा

सीबीआयने या तपासाबाबत मौन बाळगले आहे. मात्र सुशांतच्या संबंधातील अमलीपदार्थांच्या प्रकरणात एनसीबीने अनेक बड्या कलाकारांची चौकशी केली आहे आणि काहीजणांना अटकदेखील केली आहे. मात्र सीबीआयकडून अद्याप या तपासाची माहिती खुली करण्यात आली नाही. त्यामुळे सीबीआयला दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

सुशांतचा म्रुत्यु नक्की कशामुळे झाला याबाबतचे गूढ अद्यापही आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले आहे तर सीबीआयकडे आलेल्या एम्स रुग्णालयाच्या दाव्यातही हेच कारण दिले आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सुशांतने त्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती.

मुंबईतील  सर्व महत्त्वाच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा । Marathi News From Mumbai

sushant singh rajput case CBI probe petition filed to get information of investigation

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput case CBI probe petition filed to get information of investigation