रिया-सुशांत प्रकरणाशी संबंध असलेल्या ड्रग्ज पेडलरला NCBकडून मुंबईत अटक

पूजा विचारे
Wednesday, 9 December 2020

एनसीबीनं फरार ड्रग्ज पेडलरलाला अटक केली आहे. मिलत नगर लोखंडवाला एनसीबीनं छापेमारी केली.

मुंबईः अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोनं (एनसीबी) बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात मोठी कारवाई केली आहे. एनसीबीनं फरार ड्रग्ज पेडलरलाला अटक केली आहे. मिलत नगर लोखंडवाला एनसीबीनं छापेमारी केली. त्यावेळी फरार ड्रग्ज पेडलर रिगल महाकाल याला अटक करण्यात आली. 

एनसीबीने ड्रग पेडलर रिगल महाकालाल अटक केली आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकडही जप्त करण्यात आली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अनुज केशवानी जो रिया आणि सुशांतला  ड्रग्ज पुरवठा करायचा, त्या अनुजला, रिगलकडून ड्रगचा सप्लाय होत होता. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या संदर्भात एएनआयने वृत्त दिलं आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार,  सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ही मोठी कारवाई केली आहे. फरार आरोपी रिगल महाकाल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. महाकाल हा ड्रग्ज पेडलर आहे. त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.

ओशिवरा भागातील मिलत नगर आणि लोखंडवाला येथे एनसीबीनं बुधवारी सकाळी ही छापेमारी केली. यामध्ये महाकाल याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे.

महत्त्वाची बातमी- सायन रुग्णालयात कोवॅक्सीन चाचणीला सुरुवात, आतापर्यंत 15 स्वयंसेवकांना टोचली लस

Sushant Singh Rajput death case NCB arrests absconding accused Regel Mahakal


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajput death case NCB arrests absconding accused Regel Mahakal