सुशांत सिंग प्रकरण : 33 किलो ड्रग्ससह दोघांना वसईमधून अटक, तब्बल 9 कोटींचे ड्रग्स जप्त

अनिश पाटील
Thursday, 15 October 2020

सुशांत सिंग राजपुतप्रकरणी  तपास  करणाऱ्याला केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने वसई येथून दोघांना अटक केली.

मुंबई, ता.15 : सुशांत सिंग राजपुतप्रकरणी  तपास  करणाऱ्याला केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने वसई येथून दोघांना अटक केली. त्त्यांच्याकडून 33 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 9 कोटी रुपये आहे. दिवसभरात एनसीबीने चार कारवाया करून अमली पदार्थ वितरणात अटक आरोपींना अटक केली.

मुश्ताक अहमद नामक पन्नास वर्षीय इसम आणि एस.के. सौरभ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक किलो कोकेन, दोन किलो फेनसायक्लीडीन ड्रग्स (पीसीपी) आणि 30 किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. हे ड्रग्स अहमदला सौरभ द्यायचा. त्याच्या चौकशीत आरोपी मुंबईतील ड्रग्स वितरकांना ड्रग्स पुरवत असल्याची माहिती चौकशीत निष्पन्न झाली आहे.

महत्त्वाची बातमी : आयकर सहआयुक्तांच्या नावाने बनवलं फेक फेसबुक अकाउंट आणि सुरु केली पैशांची मागणी

हे ड्रग्स सौरभला राकेश खानिवडेकर आणि त्याचा भाऊ ए. खानिवडेकर यांचे असल्याचे निष्पन्न झाले. यावरून ए. खानिवडेकर याला ताब्यात घेतले असता त्याचा भाऊ राकेश खानिवडेकर याला यापूर्वी गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) 483 किलो एफिड्रीनप्रकरणी अटक केली होती. सध्या तो जामिनावर असल्याचे त्याने एनसीबीला सांगितले.

आणखी एका कारवाईत एनसीबीने प्रदिप राजाराम साहनी याला 70 ग्रॅम एमडीसह अंधेरीतून अटक केली. तो बालाजी टेलिफिल्म प्रा. लि. येथे कंत्राटदारामार्फत शिपाई म्हणून कामाला होता. तो अंधेरी व जुहूतील नागरीकांना ड्रग्स पुरवत होता.

तर आमखी एका कारवाईत नायजेरीयन नागरीक उका उमेका ऊर्फ गॉडवीन याला चार ग्रॅम कोकेनसह अटक केली. तो पाली हिल, अंधेरी, जुहू व खार परिसरातील नागरीकांना अंमली पदार्थ पुरवत होता.

महत्त्वाची बातमी : '10 च्याआत घरात'मुळे खवय्यांचा प्रतिसाद कमी, व्यवसाय यथातथाच होत असल्याची हॉटेल चालकांची खंत

याशिवाय दिल्ली एनसीबीने जम्मू काश्मिर येथे केलेल्या कारवाईत 56 किलो चरस जप्त केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्यानंतर चौकशीत हे ड्रग्स मुंबईला पाठवण्यात येणार असल्याचे निष्पन्न झाले.  याप्रकरणी भायखळा येथील फारुख शेख याला अटक करण्यात आली आहे. 

sushant singh rajput death case NCB raid and captured 33 kg of narcotic products


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput death case NCB raid and captured 33 kg of narcotic products