सुशांतचा 'तो' फोटो शेअर केलात तर महाराष्ट्र सायबर सेल करणार कारवाई 

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 15 June 2020

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये सापडला.  

 

मुंबई- बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये सापडला.  सुशांत सिंह अवघ्या 34 वर्षांचा होता. सुशांतच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. सुशांतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कलाकारांपासून ते त्यांचे त्याला श्रद्धांजली देणारे फोटो किंवा त्याच्यासोबतच फोटो शेअर करत आहेत. अशातच सुशांतच्या मृतदेहाचे फोटो देखील अनेक जण पोस्ट करत असल्याचं आढळून आलं. त्याच्या मृतदेहाचे फोटो अपलोड करू नका, असे आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतरही हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असल्याचं आढळून आलं. त्यावर आता  महाराष्ट्र सायबर सेलनेही निषेध करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

सुरक्षित अंतरासाठी नागरिकांची खासगी वाहनाला पसंती! टू व्हिलर विक्रीला वेग येण्याची आशा

कोरोना चाचणी शिवाय 'नो एन्ट्री'; गावी अडकलेल्या रहिवाशांसाठी सोसायटयांनी काढला फतवा..  
महाराष्ट्र सायबर सेलनं ट्वीट केलं आहे. सोशल मीडियावर सध्या एक चिंताजनक ट्रेंड दिसत आहे. यात दिवंगत सुशांत सिंह राजपूत यांचा फोटो व्हायरल केला जात आहे. हे फारच वाईट आणि त्रासदायक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सायबर सेलनं कारवाईचेही आदेश दिलेत. या ट्विटमध्ये महाराष्ट्र सायबर सेलनं लिहिलं आहे की, सोशल मीडियावर असे फोटो पसरवणं कायदेशीर मार्गदर्शक सूचना आणि कोर्टाच्या आदेशांच्या विरोधात आहे. असे केल्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

या ट्विटआधी महाराष्ट्र सायबर सेलनं आणखी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये महाराष्ट्र सायबर सेलनं असे फोटो शेअर करण्यास टाळावे असे निर्देश दिले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला सुशांतच्या मृतदेहाचा तो फोटो काढून टाकण्यात यावा, असेही ट्वीट सायबर सेलनं केलं आहे. 

सुशांतचे कुटुंबीय मुंबईत पोहोचले

 

सुशांत सिंह राजपूत याने काल मुंबईत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूड आणि राजकारणातही मोठा धक्का बसला आहे. सुशांतवर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सुशांतचा कौटुंबिक मित्र निशांत जैनने याबाबतची माहिती दिली. यासाठी त्याचे वडील केके सिंह आणि पाटणा इथला चुलत भाऊ आणि सुपौल इथला भाजपचे आमदार नीरज कुमार बाबूल यांच्यासह अन्य दोन सदस्य सकाळीच विमानानं मुंबईला रवाना झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput died, maharashtra cyber cell warns people sharing his dead body photos up mhpg