esakal | 'सुशांतसिंह चांगला कलाकार होता आणि एक चांगला माणूसही'
sakal

बोलून बातमी शोधा

'सुशांतसिंह चांगला कलाकार होता आणि एक चांगला माणूसही'

सुशांतसिंह चांगला कलाकार होता आणि एक चांगला माणूसही होता.असे कौतुक न्या शिंदे यांनी सुनावणी दरम्यान केले.

'सुशांतसिंह चांगला कलाकार होता आणि एक चांगला माणूसही'

sakal_logo
By
सुनीता महामुणकर

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याच्या बहिणींनी त्याला बोगस प्रिस्क्रिप्शन बनवून दिलं होते असे उघड झाले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी गुन्हा का दाखल केला असा प्रश्न उपस्थित करण्यात तथ्य नाही, असा युक्तिवाद आज राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

सुशांतसिंह चांगला कलाकार होता आणि एक चांगला माणूसही होता. एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातील त्याचे काम सर्वांना आवडले होते, असे कौतुक न्या शिंदे यांनी सुनावणी दरम्यान केले.

सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीने प्रियंका आणि मितू यांच्या विरोधात फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. ही तक्रार रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका केली आहे. मुंबई पोलिसांनी गुन्हा का दाखल केला, सीबीआय सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात तपास करीत आहे असा युक्तिवाद सिंह बहिणींनी केला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे आणि तो सीबीआयकडे वर्ग केला आहे. त्याच्या मोबाईलवरुन मिळालेल्या माहितीनुसार संबंधित प्रिस्क्रिप्शन बनावट आहे आणि त्याद्वारे एनडीपीएसने प्रतिबंधित केलेली औषधे उपलब्ध केल्याचे दिसते. त्यामुळे गुन्हा नोंदविण्याचा पोलिसांना अधिकार नाही हा प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही, असे समर्थन सरकारकडून करण्यात आले. मात्र ही औषधे प्रतिबंधित नाही, असे सिंह बहिणींच्या वतीने सांगण्यात आले.

सुशांतला बेकायदेशीरपणे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे दिली जात होती, मी घराबाहेर पडल्यानंतर त्याच्या घरचे तिथे होते. त्यामुळे त्याच्या म्रुत्युला ते जबाबदार आहेत, असे रियाने तक्रारीमध्ये म्हटले आहे. मात्र रियाची तक्रार अंदाजांवर आहे असा सीबीआयचा दावा आहे.

हेही वाचा-  शड्डू घुमणार! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाला सरकारची परवानगी

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Sushant Singh Rajput was good actor and also good man Appreciation Judge

loading image