'सुशांतची हत्या की आत्महत्या उलगडा होणार'? एनसीबीचे मुंबईत छापे; व्हिसेरा अहवाल येणार

'सुशांतची हत्या की आत्महत्या उलगडा होणार'? एनसीबीचे मुंबईत छापे; व्हिसेरा अहवाल येणार


मुंबई  : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा अहवाल शुक्रवारी मिळणार आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबतचे गुढ लवकरच उकलण्याची  शक्यता आहे. अहवालाच्या आधारे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) पुढील तपास करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा अहवाल मिळाल्यानंतर तो मेडिकल बोर्डाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. तसेच एम्सच्या डॉक्टरांचे एक पॅनेल या प्रकरणी एक बैठक करणार असून  व्हिसेरा अहवालाबरोबरच त्याच्या शवविच्छेदन अहवालाबाबत देखील चर्चा केली जाणार आहे.
रिया आणि तिचा भाऊ शौविकला अटक केल्यानंतर बॉलिवूडमधील अमली पदार्थ पुरवठ्याचे प्रकरण समोर आले आहे. अमली पदार्थ  प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती यांच्याकडून एनसीबीच्या चौकशीत धक्कादायक माहिती मिळाली आहे. रिया आणि शोविक यांच्या मोबाइल चॅटमधून अमली  पदार्था  संदर्भात मोठी नावे समोर असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली आहे. त्यानुसार, एनसीबीने गुरुवारी मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले. यामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्त तसेच तस्कराना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणारे सीबीआयचे एक पथक  मुंबईहून दिल्लीला पोहोचले आहे.

कलाकारांचा आक्षेप 
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात एनसीबीने रियाला अटक केल्यानंतर शांत असलेले बॉलीवूड कलाकार अचानक तिच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत. रिया सोबतचा माध्यमांचा व्यवहार पाहून हे सर्व एकजूट झाले आहेत.  बॉलीवूडमधील काही कलाकारांनी माध्यमांना एक खुले पत्र लिहीले आहे. यात त्यांनी स्वाक्षरी करून सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणात सुरू असलेल्या चौकशीत रियाला दिल्या जाणा-या वागणुकीवर आक्षेप नोंदविला आहे.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com