
हिंदी सक्तीबाबतचे जीआर रद्द केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा आज विजयी मेळावा होत आहे. वरळीतील डोम सभागृहात होणाऱ्या या मेळाव्यात १८ वर्षांनी पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर दिसतील. मनेसकडून मराठीसाठी आक्रमक भूमिका घेतली जात आहे. याविरोधात शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी सोशल मीडियावरून राज ठाकरेंना डिवचलं होतं. आता एका वृत्तवाहिनीवर चर्चेत सहभागी झालेल्या केडियांना मराठीत प्रश्न विचारताच त्यांनी पळ काढला.