स्वच्छ रेल, स्वच्छ भारत मोहिमेला कल्याणमध्ये सुरवात

kalyan
kalyan

कल्याण : महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती निमित्त रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2018 या स्वच्छता हीच सेवा - पंधरवडा देशभरात साजरी करण्यात येणार असून, कल्याण रेल्वे स्थानकात आज (ता. 15) स्वच्छ रेल, स्वच्छ भारत मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी कल्याण रेल्वे स्थानक मधील विविध विभाग मधील 61 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने एकत्र येऊन स्वच्छतेची शपथ घेतली. 

महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती निमित्त रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2018 या स्वच्छता हीच सेवा - पंधरवडा देशभरात साजरी करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या स्वच्छ रेल स्वच्छ भारत या मोहिमेला आज (ता. 15) पासून सुरुवात झाली. कल्याण रेल्वे स्थानकमध्ये ही या मोहिमेला सुरुवात झाली. स्टेशन मास्तर प्रदीपकुमार दास, स्टेशन डायरेक्टर यशवंत व्हटकर सहित कल्याण रेल्वे स्थानक मधील विविध विभागातील 61 हुन अधिक अधिकारी कर्मचारी वर्गाने एकत्र येऊन स्वच्छतेची शपथ घेतली. तद्नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टिव्हीवरील लाईव्ह भाषण ऐकले, त्यानंतर दोन सत्रात कल्याण रेल्वे स्थानक परिसरात अधिकारी कर्मचारी वर्गाने स्वच्छता मोहीम राबवली. 

स्वच्छ रेल्वे स्थानकाचा पहिल्या 20 मध्ये येण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली. देशात सर्वात घाणरेडे रेल्वे स्थानकाच्या यादीत कल्याण रेल्वे स्थानकाचे नाव आल्यानंतर सर्व स्तरातून टिका झाल्यावर कल्याण रेल्वे स्थानक स्वच्छ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली असून स्वच्छ रेल्वे स्थानकाचा यादी मध्ये पहिल्या 20 च्या आत कल्याण रेल्वे स्थानकाचे नाव येण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. 

स्वच्छता मोहीम अंतर्गत विविध कार्यक्रम...
15 सप्टेंबर रोजी स्वच्छता जागरूकता, 16 सप्टेंबर आणि 17 सप्टेंबर स्वच्छ संवाद, 18, 19 सप्टेंबर रोजी स्वच्छ स्थानक, 20 आणि 21 सप्टेंबर रोजी स्वच्छ रेल्वेगाडी, 22 सप्टेंबर रोजी सेवा दिवस, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी स्वच्छ परिसर, 25 आणि 26 सप्टेंबर रोजी स्वच्छ आहार, 27 आणि 28 सप्टेंबर रोजी स्वच्छ पाणी, 29 सप्टेंबर रोजी स्वच्छ शौचालय, 30 सप्टेंबर रोजी स्वच्छ स्पर्धा, 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छ समीक्षा, आदी कार्यक्रम कल्याण रेल्वे स्थानकात राबविण्यात येणार असून अधिकारी कर्मचारी सहभागी होणार असून यात प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी ही सहभाग घ्यावे असे आवाहन कल्याण रेल्वे स्टेशन मास्तर प्रदीपकुमार दास यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com