एकाचवेळी टाईप करा अनेक गॅजेट्‌सवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

आयआयटी मुंबईकडून मराठी भाषेतला 'स्वरचक्र' की-बोर्ड
मुंबई - एकाचवेळी अनेक उपकरणांवर मराठी टायपिंगचा पर्याय असणारा "स्वरचक्र' की-बोर्ड आज वापरकर्त्यांसाठी लॉंच झाला. वापरकर्त्यांकडे असणारे एकाहून अधिक गॅजेटचा वापर पाहूनच आयआयटी मुंबईच्या इंडस्ट्रीअल डिझाईन सेंटरने हा पर्याय अँड्रॉईड वापरकर्त्यांना की-बोर्ड अंतर्गत देऊ केला आहे.

कॉम्प्युटरपेक्षा स्मार्टफोनवर अधिक वापरकर्ते भारतीय भाषांमध्ये टायपिंगचा पर्याय अवलंबत असल्यानेच ही सुविधा ग्राहकांना देऊ करण्यात आली आहे. चॅटिंग ऍप्लिकेशनमध्ये व्हॉट्‌सअप, फेसबुक मॅसेंजर, हाइक, व्हायबर यांसारख्या ऍप्लिकेशनमध्ये भारतीय भाषा वापरताना स्मार्टफोनची अर्धी स्क्रिन वापरली जाते. त्यामुळे एका फोनवरून दुसऱ्या फोनवर टाईप करण्याचा पर्याय "स्वरचक्र'ने उपलब्ध केला आहे. रिशेपिंग द एक्‍सपेक्‍टेड फ्युचर या प्रकल्पांतर्गत इंग्लंडमधील स्वॅनसिया विद्यापीठाच्या मदतीने हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. "स्वरचक्र'चे बारा भारतीय भाषांमध्ये 18 लाख वापरकर्ते आहेत. त्यापैकी 4.5 लाख वापरकर्ते हे मराठी भाषिक आहेत.

या तंत्रज्ञानाला "बेटर टुगेदर फ्रेमवर्क' असे नाव देण्यात आले आहे. या फ्रेमवर्कमुळे वापरकर्त्यांना एकाचवेळी अनेक गॅजेट्‌सवर मोबाईल की बोर्ड वापरता येतो. या फ्रेमवर्क अंतर्गत आयआयटी मुंबईत आयडीसी विभागाने मराठी आणि कन्नड या भाषांसाठी फ्रेमवर्क विकसित केला आहे. सध्या "स्वरचक्र' या की-बोर्ड अंतर्गत 12 भाषांसाठी टायपिंगचा पर्याय आहे. त्यापैकी सध्या फ्रेमवर्कमुळे केवळ दोन भाषांमध्येच एकाचवेळी अनेक स्क्रिनवर टायपिंगचा पर्याय आहे. या प्रकल्पासाठी मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडिया, आयबीएम रिसर्च इंडिया, आय हब रिसर्च, मायक्रोसॉफ्ट रिसर्च युके, मर्सीकॉप्स, सोशल इम्पॅक्‍ट लॅब आणि युनिव्हर्सिटी ऑफ केप टाऊनने मदत केली आहे.

Web Title: swarchakra keyboard launch