'स्वच्छ भारत' मोहिमेत कैदीही होणार सहभागी

मंगेश सौंदाळकर
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

ठाणे तुरुंगातील 25 कैदी करणार सफाई
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "स्वच्छ भारत' या मोहिमेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता यात कैदीही सहभागी होणार आहेत. ठाणे तुरुंगातील 25 खुले कैदी स्वच्छतेचे काम करणार आहेत.

ठाणे तुरुंगातील 25 कैदी करणार सफाई
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "स्वच्छ भारत' या मोहिमेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता यात कैदीही सहभागी होणार आहेत. ठाणे तुरुंगातील 25 खुले कैदी स्वच्छतेचे काम करणार आहेत.

याबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त पोलिस महासंचालक (तुरुंग प्रशासन) विभागाला पाठवण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळण्याची शक्‍यता आहे. स्वच्छता मोहिमेत कैदी सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. राज्यात नऊ मध्यवर्ती, 31 जिल्हा, 13 खुले तुरुंग, 172 उपतुरुंग आणि एक खुली वसाहत आहे. ठाणे तुरुंगात सध्या 25 खुले कैदी आहेत. काही दिवसांपूर्वी "स्वच्छ भारत' मोहिमेत खुल्या कैद्यांना सहभागी करता येईल का? यावर तुरुंग प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. ठाणे तुरुंग प्रशासनाने 25 खुल्या कैद्यांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यावर कैदी महिन्यातून एकदा स्वच्छतेचे काम करतील. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, झोपडपट्ट्या आणि रुग्णालय परिसरात सफाई करतील. स्वच्छता मोहिमेत कैद्यांनाही घेणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरेल.

"रेडिओ जॉकी' लवकरच
कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तुरुंगात खास कक्ष तयार करण्यात आला आहे. त्या कक्षात जाऊन कैदी "रेडिओ जॉकी'प्रमाणे गाणे गातील. यासाठी काही कैद्यांची निवडही झाली आहे. लवकरच या कक्षाचे उद्‌घाटन होणार आहे.

Web Title: swatch bharat campaign prisoner will participate