
Swiggy
ESakal
उल्हासनगर : ऑर्डर दिली; पण डिलेव्हरीच नाही! कारण उल्हासनगरात फूड डिलेव्हरी सेवा ठप्प झाली आहे. कंपनीच्या जाचक अटी आणि दरकपातीविरोधात स्वीगीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मनसेच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला आता अधिक जोर आला आहे. ऑनलाइन सुविधांच्या सवयी झालेल्या ग्राहकांना मात्र आता ‘डिजिटल उपवास’ करण्याची वेळ आली आहे.