मुंबईला पुन्हा 'स्वाईन फ्लू'चा धोका; जूनमध्ये आढळले 5 रुग्ण

मुंबईला पुन्हा स्वाईन फ्लूचा धोका; जूनमध्ये आढळले 5 रुग्ण दिलासादायक गोष्ट म्हणजे एकाचाही मृत्यू नाही Swine Flu is back in Mumbai as 5 patients affected fortunately no one is dead
मुंबईला पुन्हा 'स्वाईन फ्लू'चा धोका; जूनमध्ये आढळले 5 रुग्ण

दिलासादायक गोष्ट म्हणजे एकाचाही मृत्यू नाही

मुंबई: एकीकडे दुसऱ्या लाटेत कोरोना (Covid 19) रुग्णांवर उपचार सुरू असताना दुसरीकडे एच1 एन1 म्हणजेच स्वाईन फ्ल्यू (Swine Flu) आजारानेसुद्धा आता डोकं वर काढलं आहे. मुंबईत (Mumbai) सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असताना स्वाईन फ्लूचे 5 रुग्ण एकट्या जून महिन्यात आढळले आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 20 जूनपर्यंत स्वाईन फ्लूच्या 5 रुग्णांची नोंद झाली तर मे महिन्यात फक्त एकाच रुग्णांची नोंद करण्यात आली. असे एकूण सहा रुग्ण मुंबईत नोंदवले गेले आहेत. तर, आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू स्वाईन फ्लू मुळे झालेला नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Swine Flu is back in Mumbai as 5 patients affected fortunately no one is dead)

मुंबईला पुन्हा 'स्वाईन फ्लू'चा धोका; जूनमध्ये आढळले 5 रुग्ण
"भाजपशी जुळवून घ्या? का? म्हणजे आम्ही पैसे खायला मोकळे होऊ?"

दरम्यान, 2020 मध्ये स्वाईन फ्लूचे एकूण 44 रुग्ण आढळले होते. पण जूनपर्यंत एकाही रुग्णाची नोंद करण्यात आली नव्हती. त्यामुळे, त्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्ल्यूच्या केसेस या 50 टक्क्यांनी कमी असल्याचं मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. तरीसुद्धा, रुग्णांमध्ये नेमका कोणता आजार आहे? याचे निदान करणे या परिस्थितीत काहीसे अवघड असल्याचं काही डॉक्टरांचं म्हणणं आहे.

मुंबईला पुन्हा 'स्वाईन फ्लू'चा धोका; जूनमध्ये आढळले 5 रुग्ण
'शोले'चा रिमेक अन् संजय राऊत; भाजप नेत्याच्या ट्वीटची चर्चा

चाचण्या करणे गरजेचे-

स्वाईन फ्लू आणि कोविड -19 रुग्णांमधील लक्षणे सारखीच असल्याने इन्फ्लूएंझा एच1 एन1 च्या लक्षणांचा देखील विचार करण्यात यावा असा सल्ला संसर्गजन्य रोग तज्ज्ञांनी दिला आहे. कारण, कोविड उपचारांना रुग्ण प्रतिसाद देत नसल्यास स्वाईन फ्लूची तपासणी करावी असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. संसर्गजन्य रोग तज्ज्ञ आणि टास्क फोर्स सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले की, एच 1 एन 1 आणि कोविड -19 हे दोघेही श्वसन रोग असल्यामुळे योग्य निदान करणे आवश्यक आहे. दोघांच्याही लक्षणांमध्ये बरीच समानता आहेत, परंतु व्हायरसमध्येही फरक आहे. पण, लक्षणांवरुन कोरोना आहे कि स्वाईन फ्लू झाला आहे हे सांगता येणार नाही. त्यासाठी चाचणी करावीच लागेल. दोन्ही आजार एकत्र होण्याची ही शक्यता आहे. दोन्ही चाचण्या केल्यानंतर जर दोन्ही आजार निष्पन्न झाले तर तसे उपचार द्यावे लागतील. दोन्ही आजार श्वसनासंबंधी जरी असले तरी श्वासोच्छवासाला सोडूनही इतर अवयवांमध्येही स्वाईन फ्लू होऊ शकतो. एच1 एन1 च्या पॉझिटिव्ह अहवालाकडे दुर्लक्ष करू नये कारण यामुळे गंभीर आजार किंवा मृत्यू देखील होऊ शकतो.

मुंबईला पुन्हा 'स्वाईन फ्लू'चा धोका; जूनमध्ये आढळले 5 रुग्ण
'हे सरकार आहे की तमाशा..?'; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल

लक्षणे सारखी असल्याने आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान-

कोविड 19 आणि स्वाईन फ्ल्यू आजाराची लक्षणे सारखीच आहेत. ही लक्षणे ओव्हरलॅप होतात. त्यामुळे स्वाईन फ्ल्यू आणि कोविड 19 आजार ओळखणे हे थोडं अवघड आहे. स्वाईन फ्ल्यूमध्ये नाकातून पाणी गळणे, सर्दी होणे, अशी लक्षणे आढळतात तर कोविड 19 मध्ये ताप येणे, चव जाणे, वास न येणे अशी लक्षणे आढळतात. दोन्ही आजार उद्भवले तर एकाच वेळेस दोन्ही आजारांवरील उपचार गरजेचे असल्याचं मत ही डॉ. श्रीवास्तव यांनी मांडले.

यावर्षात महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, एच1एन1 ची 5 प्रकरणे समोर आल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली होती त्यावेळी 44 रुग्णांची नोंद झाली होती. तर 2019 मध्ये 451 रुग्णांची नोंद झाली होती आणि 5 जणांचा मृत्यू झाला होता.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com