नवी मुंबईत काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

बेलापूर - केंद्र सरकार आणि भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत चुकीचे आणि द्वेषाचे राजकारण केले जात आहे. देशातील शांतता आणि सलोखा नष्ट झाला असून सरकारच्या नाकर्तेपणामुळे अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळून आले. त्यामध्ये अनेकांचे जीव गेले. दलितांवर अन्याय होत आहेत, असा आरोप करत नवी मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांनी कोकण भवन येथे सोमवारी लाक्षणिक उपोषण केले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत उपोषण केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी देशभरात लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हे उपोषण करण्यात आले.

Web Title: symbolic fasting of Congress in Navi Mumbai