esakal | पुतण्यावर बलात्काराचा आरोप, काका किशनकुमार यांनी केला खंडणीचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

पुतण्यावर बलात्काराचा आरोप, काका किशनकुमार यांनी केला खंडणीचा आरोप

पुतण्यावर बलात्काराचा आरोप, काका किशनकुमार यांनी केला खंडणीचा आरोप

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: टी सिरिज (t-series) कंपनीचे संचालक व प्रोड्युसर किशनकुमार (kishankumar) यांनी खंडणी (extoration) प्रकरणात तक्रार नोंदवली आहे. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली जात होती. मलिक्काअर्जुन पुजारी असे आरोपीचे नाव आहे. कालच गीतकार गुलशन कुमार यांचे पुत्र आणि टी सिरिज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार (bhushan kumar) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा अंधेरीमध्ये दाखल झाला आहे. (t-series bhushan kumar is charged under rape case kishan kumar alledge extoration on another party dmp82)

त्यानंतर आता किशनकुमार यांनी खंडणीचा आरोप करत तक्रार नोंदवली आहे. आरोपी मागील अनेक दिवसांपासून वारंवार फोन करून पैशांची मागणी करत असून अन्यथा मिडियात जाण्याची धमकी देत बदनामी करत आहे, असे किशनकुमार यांनी आपल्या तक्रारीत म्हठले आहे.

हेही वाचा: मुंबईच्या विकासात सेलिब्रिटींची आडकाठी !

3 जुलै पासून आरोपी वारंवार फोन करून खंडणी मागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कालच एका तरुणीने टी सिरिज कंपनीचे प्रोड्युसर भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप करत तक्रार नोंदवली. टी सिरीजच्या प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमीष दाखवून 30 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप पिडितेने केला आहे. पीडित महिलेने भूषण कुमार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. भूषण कुमार हे गेली तीन वर्षे अत्याचार करत असल्याचे त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा: थेंबे थेंबे तळे साचे...अनं मुंबईत तळे झाले रिकामे!

गीतकार गुलशन कुमार यांनी नावारूपाला आणलेली टी सिरीज ही कंपनी गेल्या काही दिवसात अनेकदा वादात सापडली आहे. भूषण कुमार यांच्याविरोधात अंधेरीच्या डि.एन.नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

loading image