ताडगोळे विक्रीसाठी बाजारात दाखल ; 60 ते 70 रुपये डझन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

कल्पवृक्षाप्रमाणे वाढणारे ताडाचे झाड हे सर्वाधिक समुद्रकिनार पट्टीवरील खाऱया जमिनीत वाढणारे झाड आहे. या झाडाची उंची 40 ते 50 फूट असते. झाडाची पूर्ण वाढ होण्यासाठी 7 ते 8 वर्षांचा कालावधी लागतो.

वाडा : वाडा तालुक्यातील बाजारपेठेत गारम गार रसरसीत ताडगोळे दाखल झाले असून, एका डझनाला 60 ते 70 रूपयांचा भाव आहे. उन्हाळ्यात गमीॅसाठी ताडगोळे चांगले म्हणून ताडगोळ्यांना चांगली मागणी असल्याचे विक्रेते सांगत आहेत. 

कल्पवृक्षाप्रमाणे वाढणारे ताडाचे झाड हे सर्वाधिक समुद्रकिनार पट्टीवरील खाऱया जमिनीत वाढणारे झाड आहे. या झाडाची उंची 40 ते 50 फूट असते. झाडाची पूर्ण वाढ होण्यासाठी 7 ते 8 वर्षांचा कालावधी लागतो. त्यानंतर फळे लागतात. ही नारळासारखी कडक असून, आत गोड पाण्याने भरलेले रसरसीत तीन ते चार पांढऱ्या रंगाचे मऊ असे गोळे असतात याला ताडगोळे म्हणतात. यात मधूर गोड असे 20 ते 25 मिमी पाणी असते, याचा उपयोग गरमी कमी करण्यासाठी केला जातो. 60 ते 70 रुपये डझनाने त्याची विक्री होते .वाडा कुडूसच्या बाजारपेठेत आता पाहायला मिळत आहेत. 

ताडगोळ्याप्रमाणेच जांभुळ, करवंदे, आंबे हे रानमेवेही बाजारात दाखल झाले आहेत. यातून शेतकरी व आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होतो. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिक त्रृतृमानाप्रमाणे उदरनिर्वाहाची साधने शोधतो. पावसाळ्यात शेतमजुरी, उन्हाळ्यात जांभुळ, आंबे, करवंदे, मोहाची फुले,  ताडगोळे विकून उदरनिर्वाह करत असल्याचे दिसून येते. येथील काही शेतकरी थेट मुंबईच्या बाजारपेठेत जांभुळ घेऊन विकायला जातात.

Web Title: Tadagale filed for sale in the market

टॅग्स