बंदच्या हिंसक वळणाची जबाबदारी घेता का? रझा अकादमीने दिलं उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बंदच्या हिंसक वळणाची जबाबादारी घेता का? रझा अकादमीने दिलं उत्तर

त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला महाराष्ट्रातल्या काही भागात हिंसक वळण लागलं आणि रझा अकादमी पुन्हा एकदा चर्चेत आली. सामाजिक सलोखा बिघडवण्यामागे आणि उसळलेल्या दंगलीमागे रझा अकामदीचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र रझा अकादमीनं सगळे आरोप फेटाळून सावलेत. कुठल्याही हिंसाचाराविरोघात आम्ही आहोत. राजकारणापोटी आम्हाला टार्गेट केलं जात, आमच्या संस्थेबद्दल खूप गैरसमजूती परसवल्या जात असल्याचा रझा अकादमीने म्हटलंय. रझा अकादमीचे संस्थापक आणि अध्यक्ष सईद नुरी यांच्याशी केलेली बातचीत :

प्रश्न - तुम्ही पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागलं, याची जबाबदारी तुम्ही घेताय का?

उत्तर - सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट ही की रझा अकामदमीने पुकारलेला बंद हा फक्त मुंबईपुरता मर्यादित होता. आम्ही शांततापुर्ण बंदचं आवाहन केलं होतं, नागरीकांनी त्याला प्रतिसाद दिला. राज्यात इतर ठिकाणचा बंद तिथल्या नागरीकांनी स्वयंस्फुर्तीनं केला होता. त्यामुळं तिथं हिंसक वळण का लागलं, दंगल का झाली, कुणी केली, याबद्दल आम्हाला काही माहीत नाही. पोलिसांनी याची निष्पक्ष चौकशी करावी, दोषीवर गुन्हे दाखल करावेत, सत्य समोर येईलच.

प्रश्न - दंगल घडवून आणणारी आणि सामाजिक विद्वेष पसरवणारी संस्था म्हणून रझा अकादमीकडे बघीतलं जातं.

उत्तर - रझा अकादमी ईश्वराला मानणारी संस्था आहे, त्यामुळं दंगे करणं आणि असंतोष पसरवणं हे काम आम्ही कधीच करत नाही. रझा अकादमीला मुद्दाम टार्गेट केलं जातं. आमच्या संघटनेचा आतापर्यंत कोणत्याही दंगलीत समावेश नव्हता आणि नसतो. सामाजिक शांतता, सलोखा निर्माण करणे हा आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. दंगली घडवण्याचा नाही.

प्रश्न - 2012 मध्ये झालेल्या आझाद मैदान दंगल घडवण्याचा आरोप रझा अकादमीवर लावण्यात आला होता

उत्तर - आझाद मैदानात झालेल्या आंदोलनात आणखीही काही संघटना सहभागी होत्या, तिथंही जे काही झालं त्यात रझा अकादमीचा काहीही हात नव्हता. आमच्यावर गुन्हे दाखल केले, मात्र ते गुन्हे कोर्टात सिध्द झाले नाही. आम्ही काही केलंच नाही, तर दंड भरण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही कोणताही दंड भरणार नाही.

प्रश्न - रझा अकादमी स्थापन करण्यामागीत नेमके काय उद्देश आहे. कुठल्या विचारधारेतून याची स्थापना झाली

उत्तर - 1978 मध्ये स्थापन रझा अकाममीची स्थापना झाली, ही एक धार्मिक संस्था आहे. सुन्नी पंथाचे महान विद्वान अहमद रझा खान यांचं साहित्य छापुन त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मुख्यत्वे या संस्थेची स्थापनी झालीये. अहमद रझा यांनी 1000 पेक्षा जास्त पुस्कतं लिहीलीयेत, रझा अकादमीनं त्यांची आत्तापर्यंत जवळपास 850 पुस्तकं छापली आहेत. अहमद रझा यांना मानणारा एक मोठा मुस्लीम वर्ग आहे. हा पंथ सुन्नी बरेलवी पंथ म्हणून ओळखला जातो. या पंथाला मानणारे मुस्लिम रझा अकादमीला फॉलो करतात.

हेही वाचा: 'राहुल गांधी ट्विट करतात अन् लगेच महाराष्ट्रात मोर्चा कसा निघतो?'

प्रश्न - रझा अकादमीत कार्यकर्ते कसे दाखल होतात.

उत्तर - रझा अकादमी ही एक वैचारीक संघटना आहे, त्यामुळं आमच्या सोबत यायला आम्ही कुणालाही जबरदस्ती करत नाही, आमचे किती फॉलोअर आहेत, हे आम्हाला माहीत नाही. कोणतंही काम असेल तर आम्ही तसं लोकांना आवाहन करतो, ज्यांना आमचे विचार पटतात ते आमच्यासोबत येतात. राज्यात मुंबई, भिवंडी, मालेगाव जालना, अशा जवळपास 35 ते 40 महत्वाच्या ठिकणी आमच्या शाखा आहेत, मदतकेंद्र म्हणून आम्ही त्याचा वापर करतो.

प्रश्न - रझा अकादमी कुठल्या सामाजिक कामात सहभागी होती

उत्तर - कोणत्याही संकटाच्या वेळी रझा अकादमी नेहमी मदतीला तयार असते. महाराष्ट्राच्या ज्या कानाकोपऱ्यात दुष्काळ असतो, अशा खेड्या पाड्यांच्या ठिकाणी जाऊन रझा अकादमी तथल्या नागरीकांसाठी पाणी पुरवते. तसंच शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या कुटूंबालाही आम्ही मदत करतो. कोरोना काळातही आम्ही जनजागृती करत होतो.

पुलवामा दहशतवादी हल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळ्यात आधी भेंडीबाजार बंदचं आवाहन केलं होतं, त्यानंतर काश्मिरी पंडीतांवर हल्ले झाले तेव्हाही आम्ही त्यांच्या सोबत होतो. 26/11 च्या हल्यानंतर पाकिस्तानला अतिरेकी राष्ट्र घोषित करावं ही मागणी आम्ही सर्वात आधी केली होती.

हेही वाचा: रोज TV पाहताय? पण त्यामागची कल्पना कोणाची होती माहितीये का?

प्रश्न - रझा अकादमीवर राजकिय वरदहस्त असल्याचा आरोप होतोय

उत्तर - आम्ही एक धार्मिक संस्था आहोत, राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही. आमच्या नावावर राजकीय पोळी भाजून घेतली जाते. आमचे फॉलोअर्स आमचं एकतात, त्यामुळं आमची कामं करुन घ्यायला किंवा जनतेपर्यंत पोहोचायला कोणत्याही राजकिय पक्षाची गरज नाही

loading image
go to top