पर्यावरणातील बदलांकडे गांभीर्याने पाहा : राज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत चिंता व्यक्त केली आहे. फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणातील बदलांकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे. 

मुंबई - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत चिंता व्यक्त केली आहे. फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणातील बदलांकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे. 

मराठवाड्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या बातम्या आपण वाचत होतो; आता कोकणातून अशाच बातम्या येत आहेत, असे सांगत राज ठाकरे यांनी कोकणातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. हवामान बदल म्हणजे नक्की काय आणि त्याचे परिणाम आपण समजून घेतले पाहिजेत. या मुद्द्यावर जगभरात उभ्या राहिलेल्या जनआंदोलनांची आपण माहिती करून घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी फेसबुक पेजवर काही व्हिडिओही टाकले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take seriously the ecological changes says Raj