महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने कोरोनामुळे घेतला हा महत्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

गिर्यारोहण मोहिमांना 31 मार्चपर्यंत स्थगिती

मुंबई : नेपाळ सरकारने मार्चमधील सर्व गिर्यारोहण आणि गिरिभ्रमण मोहिमांवर स्थगिती आणली आहे. त्याचप्रमाणे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने 31 मार्चपर्यंत राज्यातील मोहिमा स्थगित केल्या असून, दुर्गम ठिकाणी भटकंती न करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दुर्गम भागात होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी राज्यातील गड-किल्ल्यांवर भटकंती करू नका, घरातच सुरक्षित राहा, अशी सूचना गिर्यारोहण महासंघाने केली आहे.

महामुंबई लॉकडाऊनच्या दिशेने...

कोरोना प्रादुर्भावापासून पुढील दोन आठवडे खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी बाहेर जाणे टाळावे, अशी सूचना राज्य सरकारने नागरिकांना केली आहे, परंतु अनेक उत्साही मंडळी मोकळ्या वेळेत घरात न थांबता गड-किल्ले आणि डोंगर-दऱ्यांत भटकंतीसाठी जातात. त्यामुळे अशा भागांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गिर्यारोहण, गिरिभ्रमण आणि पदभ्रमण मोहिमा न राबवण्याबाबत गिर्यारोहकांनी जनजागृती करावी, असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे व कार्यकारी अध्यक्ष ऋषिकेश यादव यांनी केले आहे.

कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नेपाळ सरकारने सर्व गिर्यारोहण मोहिमांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे गिरीप्रेमी संस्थेने अन्नपूर्णा मोहीम स्थगित केली आहे. पुढील वर्षी या मोहिमेचे नियोजन करण्यात येईल, असे उमेश झिरपे यांनी सांगितले. गिर्यारोहणावर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या शेर्पांवर या स्थगितीमुळे आर्थिक संकट कोसळले आहे असे ते म्हणाले.

Taken the decision by Maharashtra Mountaineering Federation because of the corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taken the decision by Maharashtra Mountaineering Federation because of the corona